'मला छोटा ब्लाउज दिला, कारण...', नोरा फतेहीने 'दिलबर' गाण्याच्या शुटिंग दरम्यानचा निर्मात्यांसोबतचा शेअर केला किस्सा
‘दिलबर’ आणि ‘कमरियाँ’ या गाण्यांमुळे सोशल मीडियावर प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री नोरा फतेही सध्या चर्चेत आली आहे. अभिनेत्री नोरा फतेही हिने आपल्या आरस्पानी सौंदर्याच्या जोरावर फक्त भारतातच नाही तर, जगभरामध्ये प्रसिद्धी मिळवली आहे. सध्या नोरा कास्टिंग काऊच प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. इंडस्ट्रीतल्या अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला आहे. त्याप्रमाणेच नोरालाही कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला आहे. नोराने नुकतेच मेलबर्न २०२४ च्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये राजीव मसंदला दिलेल्या मुलाखतीत एक धक्कादायक खुलासा केला आहे.
मुलाखतीत नोरा फतेहीने इंडस्ट्रीतील अनेक गुपिते उघड केले आहे. नोरा फतेहीने जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते’ चित्रपटामध्ये ‘दिलबर’ गाण्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत राहिली. गाण्यामधील तिच्या डान्स स्टेप्सने सर्वांचेच लक्ष वेधले. तिच्या या डान्सचे कलाकारांनीही मोठ्या प्रमाणावर कौतुक केले. ज्या गाण्याने तिला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली, त्या गाण्याबद्दल अभिनेत्रीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. मला ‘सत्यमेव जयते’ चित्रपटातील ‘दिलबर’ या लोकप्रिय गाण्यासाठी मला पैसे मिळाले नाहीत, असा खुलासा तिने मुलाखती दरम्यान केला.
मुलाखती दरम्यान अभिनेत्री म्हणाली, “मी जेव्हा नाव कमवण्यासाठी भारतात आली होते तेव्हा माझ्याकडे जेवणासाठीही पैसे नव्हते. त्या दरम्यान मला, ‘दिलबर’ आणि ‘कमरिया’ या गाण्यासाठी कॉल आला. तेव्हा तिने बॅग पॅक करून भारत सोडण्याचा निर्णय घेतला होता. मी सर्वात आधी ‘कमरिया’ चित्रपटासाठी शूटिंग केलं. त्यानंतर दोन आठवड्यांनी मी ‘दिलबर’ गाण्यासाठी काम केलं. त्यावेळी मला पैशांची गरज होती. पण त्यावेळी मी पैसे कमवण्यासाठी काम केलं नव्हतं. त्यावेळी मला माझ्या कामातून स्वत: ला सिद्ध करायचं होतं. ‘दिलबर’ गाण्यासाठी मी स्वत: सर्व डान्सर्सना एक आठवडा प्रशिक्षण दिलं. जेणेकरून माझ्या आणि त्यांच्या सर्व स्टेप्स जुळतील.”
‘दिलबर’ गाण्याच्या शुटिंग वेळी नोराला निर्मात्यांनी एक छोटा ब्लाउज दिला होता. छोटा ब्लाऊज वेअर करण्यासाठी अभिनेत्रीने साफ नकार दिला होता. त्यावेळी नोराने निर्मात्यांना मी हा ब्लाउज घालू शकत नाही, असं स्पष्ट शब्दात सांगितले होते. या प्रकरणावर नोरा म्हणाली की, “मला माहिती आहे की तुम्हाला मला हॉट दाखवायचे आहे. हे गाणे देखील खूप सेक्सी आहे. पण मला ते अश्लील बनवायचे नाही. मी तो ब्लाऊज वेअर करण्यासाठी नकार दिल्यानंतर माझ्यासाठी नवीन ब्लाउज बनवला गेला.”