पर्यावरण रक्षणाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली होती. जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी ५ जून रोजी साजरा केला जातो. प्रदूषणाची समस्या ही भारतासह अनेक देशात पाहायला मिळते.
सतत वाढणारे प्रदूषण हे केवळ भारतासाठीच नाही तर, आपल्या शरीरासाठीसुद्धा हानिकारक आहे. स्वस्थ आणि स्वच्छ प्रकृती असणे हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे. निसर्ग आपल्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी प्रदान करतो. प्रदूषण आणि इतर धोक्यांपासून निसर्गाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने पर्यावरण दिवस साजरा केला जात आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
याचदरम्यान मराठी अभिनेता पृथ्वीक प्रताप याने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बीच क्लीन अप मोहीम साजरी केली आहे. पृथ्वीक प्रताप एका चौपाटीवर पडलेला कचरा साफ करताना दिसत आहे. हा कचरा तो एकटा गोळा करत नसून त्यांच्या सोबत एक ग्रुपसुद्धा हे काम करताना दिसत आहे.
पर्यावरणही काळजी घेणे हे आपलं काम आहे. पर्यावरणच रक्षण हे फक्त जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नसून रोजच्या दिवसात साजरे केले पाहिजे. स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण आणि ऊर्जा संवर्धन यांसारख्या उपायांचा अवलंब करून आपण पर्यावरणाच्या रक्षणात मोठे योगदान दिले पाहिजे.
[read_also content=”‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये आता सिनिअर सिटीझनही होणार लोटपोट https://www.navarashtra.com/entertainment/in-madness-machaenge-india-ko-hasaenge-senior-citizens-will-also-be-featured-540455/”]
पृथ्वीक प्रताप हा एक मराठी अभिनेता असून, तो मराठी नाटक अभिनेता, टेलिव्हिजन आणि तसेच कॉमेडी अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. तो सध्या मराठी टेलिव्हिजन कॉमेडी शो महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. तसेच त्याने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट गाजवले आहेत. पृथ्वीक आता नुकताच डिलिव्हरी बॉय या चित्रपटात प्रथमेश परबसोबत सहाय्यक अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.