radhika apte mrs undercover poster
अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) ही आजवर अनेक वेब सीरिज आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. राधिकाच्या आगामी चित्रपट (Radhika Apte Latest Movie)आणि वेब सीरिजची तिचे चाहते उत्सुकतेने वाट बघत असतात. आता ती लवकरच एका चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. राधिका ही ‘मिसेस अंडरकव्हर’ या चित्रपटामध्ये एका स्पाय एजंटची भूमिका साकारणार आहे. नुकतेच मिसेस अंडरकव्हर (Mrs Undercover) या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झालं आहे. या पोस्टरमधील राधिकाचा लूक पाहून प्रेक्षकांनी तिचं कौतुक केलं आहे.
झी-5 वर रिलीज होणार ‘मिसेस अंडरकव्हर’ सिनेमा
अनुश्री मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मिसेस अंडरकव्हर’ या चित्रपटामध्ये राधिका आपटे ही दुर्गा नावाच्या एका स्पाय एजंटची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात राधिकासोबतच सुमित व्यास आणि राजेश शर्मा यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. ‘मिसेस अंडरकव्हर’ चित्रपटाचं पोस्टर झी-5 च्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आलं आहे. तसेच राधिकानं देखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ‘मिसेस अंडरकव्हर’ चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये राधिकाच्या हातात बंदूक दिसत आहे. राधिकाचा मिसेस अंडरकव्हर हा चित्रपट झी-5 या ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाची राधिकाचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत.
[read_also content=”आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त साजिद नाडियाडवाला यांनी घेतली 100 मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी https://www.navarashtra.com/entertainment/sajid-nadiadwala-took-responsibility-of-100-girls-education-nrsr-374918/”]
सेक्रेड गेम्स, घूल आणि ओके कम्प्युटर यांसारख्या वेब सीरिजमधून राधिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. तसेच पॅडमॅन, मोनिका ओ माय डार्लिंग, अंधाधूंद यांसारख्या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. राधिका आपटेने 2012 मध्ये ब्रिटीश वादक आणि संगीतकार बेनेडिक्ट टेलर याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. अभिनेत्रीने तिचं लग्न सुरुवातीला सिक्रेट ठेवलं. मात्र, काही काळानंतर तिने आपल्या लग्नाबाबत जाहीर कबुलीही दिली होती. राधिका चित्रपट आणि वेब सीरिजमधील तिच्या बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. आता तिच्या नव्या चित्रपटामध्ये काय पाहायला मिळणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.