फोटो सौजन्य - Social Media
काल २८ जुलै रोजी दाक्षिणात्य सिनेस्टार धनुषचा वाढदिवस मोठ्या जोरशोरात साजरा करण्यात आला. अशामध्ये एका चर्चेला उधाण आले ते म्हणजे धनुषचा बॉलिवूड डेब्यूट! मुळात, धनुषने ‘रांझना’ या हिंदी भाषी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात एक घर केले. आजही या चित्रपटातील धनुषच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले जाते. विशेषकरून त्याचे काम पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी त्याचे चाहतेमंडळी ‘रांझना’ आवर्जून अनेकदा पाहतात. पण अशामध्ये ‘रांझना’ चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद एल राय यांचे वक्तव्य फार प्रसिद्ध होत आहे.
चित्रपटाचे दिगदर्शक आनंद यांनी नुकतीच पार पडलेल्या एका मुलाखतीमध्ये वक्तव्य केले होते की रांझना चित्रपटामध्ये असलेल्या कुंदन ( धनुषने साकारलेले पात्र) या भूमिकेसाठी अभिनेता रणबीर कपूरला कास्ट केले गेले होते. परंतु, त्याकाळी त्याची डेट मिळत नव्हती त्यामुळे रांझना चित्रपटात रणबीर दिसला नाही. मग या चित्रपटात कुंदन पात्रासाठी धनुषची एंट्री झाली आणि हा चित्रपट त्याचे बॉलिवूडमधील पदार्पण होते, जे एकंदरीत, त्याच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट ठरलं.
दिग्दर्शक आनंद यांनी रणबीरचे भरभरून कौतुक केले. त्यांचे असे म्हणणे होते की,”रणबीर स्वतःला फार साधं ठेवतो. लोकांमध्ये तो अगदी सहज मिसळून जातो. त्यामुळे मी त्याला या चित्रपटामध्ये असणाऱ्या कुंदन या पात्रासाठी परफेक्ट म्हणत होतो.” त्यांचे असे म्हणणे होते की सावरिया चित्रपटानंतर ‘रांझना’मधील सोनम आणि रणबीरची केमिस्ट्री अजरामर झाली असती. कदाचित नियतीच्या मनात काही तरी वेगळं होतं आणि धनुषने कुंदनचे पात्र गाजवून टाकले.
सिनेचाहत्यांमध्ये रांझनासाठी परफेक्ट कोण? हा प्रश्न फार चर्चेत येत आहे. अनेकांचे असे म्हणणे आहे की, “आम्हाला कुंदन या पात्रासाठी अभिनेता रणबीर कपूर पाहण्यास आवडला असता, तर अनेकांनी कुंदनसाठी धनुषच परफेक्ट होता, असे म्हंटले आहे.”