फोटो सौजन्य - Social Media
सध्या बॉक्स ऑफिसवर सैय्याराने धुमाकूळ केला आहे. देशभरात ज्याच्या त्याच्या तोंडात सैय्याराची धून ऐकू येत आहे. तरुण असो वा प्रौढ सगळ्यांना या सिनेमाने वेड लावले आहे. कुणी एकदाच पाहून येत आहे, तर कुणी अनेकदा पाहायला जात आहे. अनेक जण तर सिनेमा पाहताना अश्रूंच्या धारा काढत आहेत. तर अनेक जण लाईक्स मिळवण्यासाठी निव्वळ ड्रामा करत आहेत. अशामध्ये ‘सैय्यारा’चा लुफ्त मिळवण्यासाठी स्वतः साधू बाबा सिनेमागृहात दाखल झाले होते. त्यांना पाहून प्रेक्षकांना एक वेगळाच जोश आला आणि त्यांचे छायाचित्र काढून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले. काहीच क्षणार्धात ते साधू बाबा सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाले. अशामध्ये त्यांना अनेक सवाल-जवाब करण्यात आले होते.
या साधू बाबांनीं सैय्यारा चित्रपटाचा फायदाच जगाला समजवला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की,”जगाला हे जरूर विचित्र वाटत असेल की हा व्यक्ती एक बाबा असूनदेखील कसा काय चित्रपट पाहण्यासाठी आला? यामागचे कारण म्हणजे मी या चित्रपटाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला प्रेमाची व्याख्या पटवून देऊ इच्छितो. आजच्या पिढीत मी अनेकदा पहिले आहे की एकाच वेळी चार-चार जणांशी संबंध ठेवले जातात. त्यांच्यासाठी प्रेमाची व्याख्या समजावणे फार गरजेचे आहे.”
बाबांनी सिनेमाच्या फिल्ममेकर्सचे तसेच इतर कलाकारांचे आभार मनात त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की,”आताच्या या युगामध्ये असा सिनेमांची जगाला गरज आहे. जेणेकरून तरुणांना प्रेमाचा अर्थ माहिती पडेल.” बाबांचे हे प्रेमी रूप पाहून सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा वर्षाव झाला आहे. अनेक नेटकऱ्यांना बाबांचे म्हणणे पटले आहे तर अनेक जण बाबांची टिंगल करत आहेत. तर अनेकांनी “हे बाबा तर PR करत आहेत आणि त्यासाठीच त्यांना बोलवण्यात आले आहे” असा आरोप केला आहे.
सैय्यारा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत असून चित्रपटाने २५० कोटींचा आकडा पूर्ण केला आहे. तसेच सिनेमा देशभरात एक वेगळ्याच ट्रेंडवर आहे.