sagar karande facebook live
‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमामुळे प्रसिद्ध झालेला अभिनेता सागर कारंडे (Sagar Karande) सध्या ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ (Hich Tar Familychi Gammat Ahe) या नाटकात मुख्य भूमिका साकारत आहे. मात्र २० नोव्हेंबरला सागरची तब्येत बिघडल्यामुळे (Sagar Karande Health Update) शेवटच्या क्षणी प्रयोग रद्द करण्यात आला. यानंतर सागर कारंडेच्या तब्येतीबद्दल खूप चर्चा रंगल्या. त्यामुळे सागरने स्वत: फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या तब्येतीबाबत खुलासा केला आहे.
गिरगावच्या मुंबई मराठी साहित्य संघात ‘प्रभु प्रभात’ मासिकाच्या शताब्दीनिमित्त ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकाचा प्रयोग आयोजित केला होता. मात्र त्याच दिवशी नाटकातील प्रमुख कलाकार सागर कारंडे याची तब्येत बिघडली. शेवटच्या क्षणी प्रयोग रद्द करणे शक्य नव्हते. त्यानंतर अचानक सूत्रधार गोटय़ा सावंत यांनी फोनाफोनी करून ‘अभिजात’ संस्थेच्या ‘वासूची सासू’ या नाटकाचा प्रयोग होईल, असे जाहीर केले. हा प्रयोग यशस्वीरित्या करण्यात आला.
सागरने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं की,“गेल्या रविवारी २० नोव्हेंबरला ‘हीच तर फॅमिलीची गंमत’ या आमच्या नाटकाचा प्रयोग होता. संध्याकाळी ४ वाजता साहित्य संघला हा प्रयोग होता. पण अचानक माझ्या छातीत दुखू लागले. त्यावेळी मला चक्करही आली. दुपारी १२.३० ते १ च्या दरम्यान ही घटना घडली. त्यानंतर मी रुग्णालयात गेलो. तिकडे माझ्या सर्व तपासण्या करण्यात आल्या. तिकडून मी प्रयोगाला जाणार होतो. माझी रक्त चाचणी, ईसीजी यासारख्या चाचण्या करण्यात आल्या. याचे रिपोर्ट नॉर्मल आले. पण चेकअप वैगरे झाल्यानंतर मला डॉक्टरांनी प्रयोग करण्यास किंवा प्रवास करण्यास मनाई केली होती. त्यामुळे तो प्रयोग रद्द करण्यात आला.
पण सुदैवाने ‘वासूची सासू’ची टीम त्याठिकाणी उभी राहिली. सर्व टीमचे खूप खूप आभार. कारण तो प्रयोग कॅन्सल न होता दुसरा प्रयोग का होईना तो झाला. दिग्दर्शक, कलाकार आणि निर्माते यांचे आभार. ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. नाटकं पुन्हा होऊ शकतं, असेही ते म्हणाले.
[read_also content=”नंदेश उमप आणि प्रियांका बर्वेच्या आवाजातल्या ‘बकुळा’ गाण्यावर प्रेक्षक फिदा https://www.navarashtra.com/gallery/bakula-song-from-tdm-movie-is-released-nrsr-347464/”]
छातीत दुखण्यामागचे कारण काय असू शकते याच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या. दिवसातून चार ते पाच वेळा ईसीजी करण्यात येत होतं. तसेच २ डी इको एक ठराविक चाचणी असते तीही करण्यात आली. हे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आले. त्यानंतर डॉक्टरांनी माझ्या गेल्या काही दिवसांमधल्या वेळापत्रकाबद्दल माहिती घेतली. गेला आठवडाभर मी प्रवास करत होतो. रात्री शूटींग, नाटकाचे प्रयोग, प्रवास, जेवण वेळेवर नव्हतं, त्यादिवशी मी काही खाल्लं नसल्याने पित्ताचा त्रास झाला झाली. त्यामुळे छातीत दुखत होतं, असं डॉक्टरांनी मला सांगितलं.
कालही माझी एक चाचणी करण्यात आली. त्याचेही रिपोर्ट नॉर्मल आहेत. आताही एका चाचणीसाठी जायचं आहे. डॉक्टरांनी नुकतंच मला डिस्चार्ज दिलाय. पण मी ठणठणीत आहे. मी तुमच्याशी बोलतोय याचा अर्थ मी बरा आहे. मला काहीही झालेले नाही”, असे सागर कारंडेने यावेळी म्हटले.