Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठमोळ्या संदीप पाठकचा कॅनडामध्ये डंका, ‘काऊच फिल्म फेस्टिव्हल स्प्रिंग’मध्ये ‘राख’ चित्रपटासाठी पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

संदीप पाठकनं (Sandeep Pathak) कॅनडामधील टोरंटो येथे झालेल्या जागतिक किर्तीच्या ‘काऊच फिल्म फेस्टिव्हल स्प्रिंग २०२२’ (Couch Film Festival Spring 2022 )मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार (Sandeep Pathak Received Best Actor Award) पटकावला आहे. ‘राख’ (Raakh) या मराठी चित्रपटात संदीपनं साकारलेल्या व्यक्तिरेखेसाठी हा पुरस्कार मिळाला आहे.

  • By साधना
Updated On: Mar 29, 2022 | 01:50 PM
sandeep pathak in rakh movie

sandeep pathak in rakh movie

Follow Us
Follow Us:

आजवर बऱ्याच कलाकारांनी आपल्या अनोख्या अभिनयशैलीच्या बळावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अशांपैकीच एक असणाऱ्या अभिनेता संदीप पाठकनंही (Sandeep Pathak) अगदी पदार्पणापासून रसिकांसोबतच समीक्षकांचंही लक्ष वेधून घेत विविधांगी भूमिका साकरण्याचं काम केलं आहे. कोणतीही व्यक्तिरेखा लिलया साकारण्याचं कौशल्य अंगी असणाऱ्या संदीपनं नुकताच आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सिनेमहोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारावर आपलं नाव कोरत मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

[read_also content=”बॉलिवूडमधील वर्णभेदावर नवाजुद्दीन सिद्दीकीने साधला निशाणा, सावळ्या अभिनेत्रींना डावललं जात असल्याची उघडपणे व्यक्त केली खंत https://www.navarashtra.com/movies/actor-nawazuddin-suddiqui-comment-about-racism-in-bollywood-nrsr-261217.html”]

चित्रपट, मालिका आणि नाटकांच्या माध्यमातून रसिकांचं मनोरंजन करण्यात अग्रस्थानी असणाऱ्या संदीपनं कॅनडामधील टोरंटो येथे झालेल्या जागतिक किर्तीच्या ‘काऊच फिल्म फेस्टिव्हल स्प्रिंग २०२२’ (Couch Film Festival Spring 2022 )मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार (Sandeep Pathak Received Best Actor Award) पटकावला आहे. ‘राख’ (Raakh) या मराठी चित्रपटात संदीपनं साकारलेल्या व्यक्तिरेखेसाठी हा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या शर्यतीत संदीपसोबत नेदरलँडचा डिर्क मोहर आणि अमेरिकेचा डोनॅटो डि’लुका हे दोन तगडे अभिनेते होते. या दोघांवर मात करत संदीपनं हा पुरस्कार आपल्या नावे करण्यात यश मिळवलं. राजेश चव्हाण यांनी या सायलेंट मुव्हीचं दिग्दर्शन केलं आहे.

या चित्रपटात संवादाविना संदीपनं साकारलेल्या भूमिकेचं खूप कौतुक करण्यात आलं. ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ च्या माध्यमातून विविध देशांमधील नाट्यरसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या संदीपला मिळालेला हा पुरस्कार सर्वार्थानं त्यानं आजवर केलेल्या मेहनतीचं फळ आहे. एकीकडे विनोदी व्यक्तिरेखांच्या माध्यमातून रसिकांना पोट धरून हसवताना संदीपनं दुसरीकडे धीरगंभीर भूमिका साकारत आपल्यातील संवेदनशील अभिनेत्याचंही दर्शन घडवलं आहे. दोन भिन्न टोकांच्या व्यक्तिरेखांचा अचूक ताळमेळ साधण्याचं काम नेहमीच संदीपनं केलं आहे.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना संदीप म्हणाला की, हा पुरस्कार जरी मला मिळाला असला तरी तो माझा एकट्याचा मुळीच नाही. ‘राख’च्या संपूर्ण टिमनं घेतलेल्या मेहनतीचं हे फळ आहे. ‘राख’मधील माझं कॅरेक्टर आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळं असल्यानं यासाठी पुरस्कार मिळाल्याचा आनंद खूप वेगळा आहे. या चित्रपटासाठी घेतलेल्या मेहनतीला मिळालेली ही जणू पोचपावतीच असल्याचंही संदीप म्हणाला. संदीपनं ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘रंगा पतंगा’, ‘ईडक’, ‘एक हजाराची नोट’आदी ५० हून अधिक चित्रपटांच्या जोडीला विविध नाटकांचे अडीच हजारांहून अधिक प्रयोग आणि पंचवीसपेक्षाही जास्त टीव्ही शोजच्या माध्यमातून रसिकांचं मनोरंजन केलं आहे. लवकरच संदीपचे आणखी काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्यात त्याची वेगवेगळी रुपं पाहायला मिळणार आहेत.

Web Title: Sandeep pathak received best actor award for raakh in couch film festival spring nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2022 | 01:34 PM

Topics:  

  • Sandeep Pathak

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.