अजय देवगण (Ajay Devgn) आणि आर माधवन (R Madhavan) यांचा भयपट ‘शैतान’ 8 मार्चला म्हणजेच महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये दाखल झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. समीक्षकांनीही या चित्रपटाचे भरभरून कौतुक केलं आहे. अजय देवगणसह आर माधवनच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. ‘शैतान’ नं रिलीज होताच देशभरात बॉक्स ऑफिसवर कब्जा केला असून पहिल्याच दिवशी (Shaitaan Box Office Collection) भरमसाठ कमाई केली आहे. आता सातव्या दिवशीचंही कलेक्शन समोर आलं असुन, सातव्या दिवशीही बॉक्स ऑफिस कमाईमध्ये वाढ पाहायला मिळात आहे.
[read_also content=”बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात अँजिओप्लास्टी, आता कशी आहे प्रकृती? https://www.navarashtra.com/movies/81-years-old-super-star-amitabh-bachchan-underwent-angioplasty-in-kokilaben-hospital-nrps-515577.html”]
अजय देवगणचा ‘शैतान’ हा हॉरर चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पंसतीस उतरला आहे. चित्रपटातील प्रत्येक कलाकारच्या भुमिकेचं चांगलच कौतुक होत आहे मात्र, आर माधवननं साकारलेला खलनायकाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. अॅडवान्स बुकिंगमध्येच ‘शैतान’च्या 1 लाख 76 हजारांहून अधिक तिकिटांची विक्री झाली होती. ‘शैतान’ या चित्रपटानं पहिल्याच दिवशी भारतात बॉक्स ऑफिसवर 14.50 कोटींचा व्यवसाय केला. दुसऱ्या दिवशी 18.75 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 20.5 कोटी रुपये, चौथ्या दिवशी 7.25 कोटी रुपये, पाचव्या दिवशी 6.5 कोटी रुपये आणि सहाव्या दिवशी 6.25 कोटी रुपये कमावले आहेत. आता ‘शैतान’च्या सातव्या दिवसाच्या कमाईचे प्रारंभिक आकडे समोर आले आहेत. Sacknilk च्या रिपोर्टनुसार, चित्रपटानं रिलिजच्या सातव्या दिवशी (Shaitaan Box Office Collection Day 7) 5.75 कोटींचा गल्ला जमवला आहे.
अजय देवगणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याने यावर्षी ‘शैतान’मधून बॉक्स ऑफिसवर धमाकेदार एंट्री केली आहे. यानंतरही त्याचे अनेक चित्रपट सिनेमागृहात दाखल होण्यासाठी सज्ज आहे. त्याचे सध्या ‘मैदान’, ‘रेड 2’, ‘सिंघम अगेन’ आणि ‘औरों में कहाँ दम था’ हे चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत, जे या वर्षी प्रदर्शित होत आहेत.