वीरने बॉलीवूड पदार्पण करण्यापूर्वी वरुण धवनच्या ‘भेडिया’ चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.
आजोबा माजी मुख्यमंत्री, मावशी खासदार; तरीही वीर पहाडियाने का निवडलं नाही राजकारण? वाचा...
सध्या वीर पहारिया ‘स्काय फोर्स’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटानिमित्त वीर पहारिया अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. खरंतर त्याचा हा पहिला चित्रपट असून या चित्रपटाच्या माध्यमातूनच वीर पहारिया बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करणार आहे. कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणारा वीर पहारिया सध्या ‘स्काय फोर्स’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. राजकारणाची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या वीरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याच्या पहिल्यावहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे.
बाप्पाच्या साक्षीने सरकार- सानिका घेणार सप्तपदी, सई आणखीन कोणते रचणार नवे कटकारस्थान ?
वीर पहारियाचा पहिल्यावहिला ‘स्काय फोर्स’ चित्रपट २४ जानेवारीला बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. या चित्रपटाचे प्रेक्षकांकडून जोरदार कौतुक होत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. वीरचे आजोबा सुशील कुमार शिंदे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. तर त्याची मावशी प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभेच्या खासदार आहेत. वीर हा स्मृती शिंदे आणि संजय पहारिया यांचा धाकटा मुलगा आहे. पण वीरने कुटुंबाकडे राजकीय वारसा असतानाही अभिनयाचा मार्ग निवडला. त्याने हा निर्णय का घेतला ? यामागचं कारण एका मुलाखतीत सांगितलं आहे.
वीरला बॉलिवूडमध्ये स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण करायचं आहे. असं त्याने न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “माझ्या कुटुंबाने मोठ्या प्रमाणावर यश मिळवले आहे. मला माहित होते की, या कुटुंबात राहणे म्हणजे एका छत्रछायेखाली राहण्यासारखे आहे. माझ्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात मला माहित होते की, मी काहीतरी करण्या इतपत तरीही सक्षम आहे. मला माझी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची होती. जेव्हाही मी कुठे जायचो, तेव्हा मला त्या लोकांनी माझ्या कुटुंबामुळे ओळखावं, असं मला वाटत नव्हतं. मी कोण आहे, काय करतो त्यावरून त्यांनी मला ओळखावं अशी माझी इच्छा होती.
आपल्या बालपणाबद्दल वीरने सांगितले की, राजकीय कुटुंबाशी संबंधित असण्याचे काही तोटे आहेत, पण तरीही तो सामान्य आयुष्य जगू शकला. “जेव्हा मी पाच किंवा सहा वर्षांचा होतो, तेव्हा मला माहित होतं की, माझे आयुष्य खूप सुरक्षित आहे. काही कारणांनी आम्ही बऱ्याच गोष्टी करू शकत नव्हतो, पण तरीही मी खूप सामान्य जीवन जगलो. मला फारसे मित्र नाहीत आणि जे आहेत, ते देशभरातील अतिशय सामान्य आणि साधे लोक आहेत.” असं वीरने नमूद केलं.
वीरने हरियाणातील एका बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे, तेव्हा त्याची एका नव्या जगाची झलक पाहायला मिळाली. तिथे जे मित्र बनले, त्यांनी त्याला खूप गोष्टी शिकवल्या. “मला असं वाटतं की मी माझ्या मित्रांमुळे या देशाच्या संस्कृतीशी जोडलो गेलोय, कारण ते सगळे वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले आहेत. मी मुंबई, दिल्लीसारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये वाढलो नाही,” असं वीर म्हणाला. आधीपासूनच अभिनय करायचा होता, असंही त्याने नमूद केलं.
वीरने बॉलीवूड पदार्पण करण्यापूर्वी वरुण धवनच्या ‘भेडिया’ चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.