Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sonakshi Zaheer Wedding: अखेर धर्माच्या भिंती तोडत सोनाक्षी सिन्हा झकीर इक्बालचे लग्न, पहिल्या फोटोंची झलक

Sonakshi Zaheer Iqbal: अखेर ७ वर्षांच्या डेटिंगनंतर सर्व चर्चांना पूर्णविराम लावत आणि भिन्न धर्मांच्या भिंतींना भेद देत शत्रुघ्न सिन्हाची लाडकी सोनाक्षी सिन्हाने अभिनेता झहीर इक्बालशी लग्न केले आहे. दोघांचे लग्नानंतरचे पहिले फोटो समोर आले असून त्यांच्यावर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केलाय.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 23, 2024 | 10:03 PM
सोनाक्षी सिन्हा झहीर इक्बाल लग्न (फोटो सौजन्य - Instagram)

सोनाक्षी सिन्हा झहीर इक्बाल लग्न (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या ७ वर्षांपासून सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल एकमेकांना डेट करत आहेत. २३ जून हा दोघांच्या आय़ुष्यातील खास दिवस असून याच दिवशी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि सर्व चर्चांना पूर्णविराम देत अखेर दोघं विवाहबद्ध झाले आहेत. बांद्रा येथील सोनाक्षीच्या घरात या दोघांनी रजिस्टर्ड पद्धतीने लग्न केले आहे. कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत या दोघांनी लग्न केले. 

सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाची चर्चा गेले महिनाभर चालू होती. मात्र दोघांनी कधीही समोर येऊन कोणत्याही पद्धतीचे बोलणे केलेले नाही. तर घरातील कोणत्याही व्यक्तीने याबाबत कोणताही खुलासा केला नव्हता. मात्र गेले महिनाभर दोघांच्याही घरामध्ये लग्नाची गडबड चालू असलेली पाहायला मिळाली होती. तर सोनाक्षीचे आई-वडील या लग्नापासून आनंदी नाहीत अशीही चर्चा होती. मात्र तिच्या घरातील सर्वांनी या लग्नाला उपस्थिती लावत सर्वच चर्चांना पूर्णविराम दिलाय. 

सोनाक्षीचा साज 

सोनाक्षीचा लग्नातील लुक (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

सोनाक्षीने लग्नासाठी ऑफव्हाईट रंगाची डिझाईनर साडी निवडली होती. तर अत्यंत साध्या आणि एलिगंट लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. यासह तिने अंबाडा आणि त्यावर गजरा घालून केसांची हेअरस्टाईल केली होती. तर अत्यंत मिनिमल ज्वेलरी तिने परिधान केली होती. कुंदन हार, हातात ब्रेसलेट, कपाळावर लहानशी टिकली आणि मिनिमल मेकअपमध्ये सोनाक्षीचे सौंदर्य अधिक खुलले होते. 

झहीरचा लुक 

झहीरचा लग्नातील शेरवानी लुक (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

झहीरनेदेखील व्हाईट रंगाची शेरवानी घातली असून त्यावर बारीक कलाकुसरीची एम्ब्रॉयडरी करण्यात आली होती. दोघांनीही पांढऱ्या रंगाचे मॅचिंग कपडे घातले होते. कुठेही शोबाजी नाही आणि सहज साधे असे लग्न दोघांनी केले. यानंतर सोशल मीडियावर सोनाक्षीने आपल्या लग्नाचे फोटो पोस्ट करत मनातील भावना व्यक्त केल्या. 

काय म्हणाली सोनाक्षी

 

आजच्याच दिवशी, सात वर्षांपूर्वी (23.06.2017) एकमेकांच्या डोळ्यात बघत आम्ही एकमेकांवर प्रेम केले आणि त्याचे शुद्ध स्वरूप पाहिले आणि एकमेकांना कायम धरून ठेवण्याचा निर्णय घेतला. आज त्या प्रेमाने आम्हाला सर्व आव्हाने आणि मिळवलेल्या विजयाचे मार्गदर्शन केले आहे… या क्षणापर्यंत आणले आहे… जिथे आमच्या दोन्ही कुटुंबांच्या आणि आमच्या दोन्ही देवतांच्या आशीर्वादाने… आता आम्ही पती आणि पत्नी आहोत. येथे प्रेम, आशा आणि एकमेकांसोबत सर्व सुंदर गोष्टी आहेत, आतापासून ते कायमचे.” सोनाक्षीने पोस्टमध्ये जोडले, “सोनाक्षी वेड्स झहीर. 23.06.2024 “

सोनाक्षीचे मित्रमैत्रिणी हजर

सोनाक्षी – झहीर लग्न (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

सोनाक्षीच्या लग्नात तिच्या मित्रमैत्रिणींची आणि कुटुंबीयांची हजेरी होती. तर झहीरचे कुटुंबीयदेखील या घरातील सोहळ्यात हजर झाले होते. अत्यंत जवळच्या माणसांमध्ये हा लग्नसोहळा साजरा करण्यात आला. तर सोनाक्षीच्या लग्नानंतर ‘प्रत्येक वडील या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असताना आणि सोनाक्षी झहीर एकमेकांसह सुखी आहेत. त्यांची जोडी कायम  सुखी राहो’ असा आशिर्वाद तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी मीडियाशी बोलताना दिला. यावेळी तिची आई पूनम सिन्हादेखील उपस्थित होती. 

Web Title: Sonakshi sinha zaheer iqbal wedding first photos went viral in offwhite saree bride looks stunning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2024 | 10:03 PM

Topics:  

  • sonakshi sinaha marriage

संबंधित बातम्या

मशिदीत बूट घालून गेल्याने Sonakshi Sinha भयंकर ट्रोल; नेटकरी म्हणाले, ‘अभिनंदन! ही कन्व्हर्ट…’
1

मशिदीत बूट घालून गेल्याने Sonakshi Sinha भयंकर ट्रोल; नेटकरी म्हणाले, ‘अभिनंदन! ही कन्व्हर्ट…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.