फोटो सौजन्य - Social Media
बहुचर्चित ‘वॉर 2’ या चित्रपटाचे पहिले गाणं ‘आवा जावा’ नुकतंच प्रदर्शित झालं असून, यामध्ये अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री कियारा अडवाणीचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. अरिजीत सिंग आणि निकिता गांधी यांनी गायलेलं हे गाणं संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करत आहे. या गाण्याचे बोल प्रसिद्ध गीतकार अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले असून, संगीत दिग्दर्शक प्रीतम यांनी याला संगीत दिले आहे.
गाण्यात कियारा आणि हृतिक यांचं केमिस्ट्री अतिशय सुंदरपणे दाखवण्यात आली आहे. या दोघांनी पडद्यावर आणलेला रोमँटिक माहोल तरुण प्रेक्षकांना विशेष भावतो आहे. गाण्याचे लोकेशन्स, व्हिज्युअल्स आणि संगीत सर्व काही उच्च दर्जाचं असून, विशेषतः कियाराचा बिकिनी लूक आणि हृतिकचा आकर्षक अवतार लक्ष वेधून घेतो आहे. दोघेही या रोमँटिक गाण्यात एकमेकांसोबत आनंदाचे क्षण साजरे करताना दिसतात.
‘वॉर 2’ चित्रपटातील पहिले गाणं ‘आवा जावा’ नुकतंच प्रदर्शित झालं असून, त्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अभिनेत्री कियारा आडवाणीने हे गाणं तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केलं आहे. या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी तिला गाण्यासाठी, तिच्या ग्लॅमरस लूकसाठी भरभरून कॉम्प्लिमेंट्स दिल्या आहेत. अनेक फॅन्सनी कमेंट्समध्ये “स्टनिंग”, “गॉर्जियस” अशा प्रतिक्रिया देत तिच्या सौंदर्याचं आणि अभिनयाचं कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे, या पोस्टद्वारे चाहत्यांनी तिला वाढदिवसाच्याही शुभेच्छा दिल्या आहेत, त्यामुळे ही पोस्ट दुहेरी चर्चेचा विषय ठरली आहे.
‘वॉर 2’ ही 2019 मध्ये आलेल्या सुपरहिट अॅक्शन चित्रपट ‘वॉर’ची पुढची कथा आहे. ही फिल्म यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा भाग असून, तिचं दिग्दर्शन ‘ब्रह्मास्त्र’ फेम अयान मुखर्जी यांनी केलं आहे. यशराज स्पाय युनिव्हर्समधील ही सहावी फिल्म असून, हृतिक रोशनचा ‘कबीर’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अॅक्शन अवतारात पाहायला मिळणार आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री कियारा अडवाणी आणि दक्षिणेचा सुपरस्टार जूनियर एनटीआर देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत.
प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटाच्या टीझरपासून ते गाण्यांपर्यंत, प्रत्येक अपडेट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ‘आवा जावा’ हे गाणं केवळ एक रोमँटिक सॉंग नसून, चित्रपटाच्या मूडला सेट करणारी एक महत्त्वाची झलक आहे, असं बोललं जात आहे. संगीत, नृत्य आणि रोमँटिक केमिस्ट्री या सगळ्या गोष्टींची सरमिसळ असलेलं हे गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
‘वॉर 2’ हा बहुप्रतिक्षित अॅक्शन-थ्रिलर चित्रपट 14 ऑगस्ट 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सध्या गाण्यांमुळे, स्टारकास्टमुळे आणि दिग्दर्शनाबाबतच्या चर्चांमुळे हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. ‘आवा जावा’ हे गाणं हिट ठरत असल्यामुळे, चाहत्यांना वाटतं की हीच सुरुवात चित्रपटाच्या यशाची नांदी ठरेल.