
the kerala story
‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) चित्रपट सध्या चांगलाच गाजतोय. त्याचबरोबर चित्रपटातील कलाकरांच्या अभिनयाच चांगलच कौतुक होत आहे. अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) आणि दिग्दर्शक सुदीप्तो सेन (Sudipto Sen) यांचा रविवारी अपघात झाल्याची बातमी समोर आली होती. याबद्दल आता स्वत अदा शर्माने अपडेट दिली असून सगळं ठिक असल्याचं सांगितलं आहे.
[read_also content=”वडिलांची इच्छा होती की मुलानं IAS अधिकारी व्हावं, मुलानं मात्र उघडलं चहाचं दुकान, आता दरवर्षी 150 कोटींचा विकतोय चहा https://www.navarashtra.com/india/inspiring-story-of-anubhav-dubey-anand-nayak-who-started-chai-sutta-bar-nrps-399432.html”]
अदा शर्माने ट्विट करत चाहत्यांना तिच्याबद्दल माहिती दिली आहे. अदा म्हणाली की, आहे,”मित्रांनो मी ठीक आहे. आमच्या अपघातासंदर्भात अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण माझ्यासह आमच्या टीममधील सर्व मंडळी ठीक आहेत. कोणाला गंभीर दुखापत झालेली नाही. माझ्याबद्दल काळजी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद.
I’m fine guys . Getting a lot of messages because of the news circulating about our accident. The whole team ,all of us are fine, nothing serious , nothing major but thank you for the concern ❤️❤️ — Adah Sharma (@adah_sharma) May 14, 2023