Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमिर खान प्रोडक्शन्सच्या व्हिडिओमुळे सस्पेन्स वाढला, ‘हॅपी पटेल’चा ट्रेलर उद्या रिलीज

अमीर खान प्रोडक्शन लवकरच ‘हॅपी पटेल’ हा सिनेमा घेऊन येत आहे. यात स्पायची स्टोरी एक्शन नाही तर चक्क कॉमेडीच्या माध्यमातून दाखवली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 18, 2025 | 04:56 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • हॅपी पटेल: खतरनाक जासूस’चा ट्रेलर उद्या रिलीज
  • चित्रपटही काहीतरी वेगळं आणि मजेशीर घेऊन येईल
  • दिल्ली बेलीनंतर आमिर खान प्रोडक्शन्ससोबत त्यांची ही दुसरी भागीदारी आहे
बॉलिवूडमध्ये नेहमीच आशयघन चित्रपटांसाठी ओळखले जाणारे आमिर खान प्रोडक्शन्स आता प्रेक्षकांसाठी एक हटके आणि मजेशीर स्पाय कॉमेडी घेऊन येत आहे. ‘हॅपी पटेल: खतरनाक जासूस’ असे या चित्रपटाचे नाव असून, विनोद, ड्रामा आणि गोंधळ यांचा भन्नाट मेळ यात पाहायला मिळणार आहे. एकामागोमाग एक दर्जेदार प्रोजेक्ट्स सादर केल्यानंतर, या वेळी प्रोडक्शन हाऊसने वेगळ्या शैलीचा प्रयोग केल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

‘कधी कल्पनाही केली नव्हती…’ ‘धुरंधर’ ने Fa9la च्या Flipperachi चे बदलले आयुष्य; प्रेक्षकांचे प्रेम पाहून रॅपर भावुक

या चित्रपटाची खास बाब म्हणजे प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन आणि अभिनेता वीर दास यांची ही दिग्दर्शक म्हणून पहिलीच फिल्म आहे. या चित्रपटात वीर दास स्वतः एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असून, त्यांच्यासोबत लोकप्रिय अभिनेत्री मोना सिंगदेखील दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ऑफबीट अनाउन्समेंट व्हिडिओनेच या चित्रपटाबाबत चर्चा सुरू केली होती. त्यानंतर आता आमिर खान प्रोडक्शन्सने शेअर केलेल्या नव्या व्हिडिओमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये आमिर खान आणि वीर दास यांच्यात ट्रेलरच्या कटवरून झालेला हलकाफुलका, खटकेबाज वाद पाहायला मिळतो. व्हिडिओमध्ये वीर दास “यंग आणि क्रेझी” अंदाजाचा ट्रेलर कट दाखवण्याच्या बाजूने दिसतात, तर आमिर खान त्यांच्या सिग्नेचर “परफेक्शनिस्ट” टचसाठी आग्रही असतात. या गंमतीशीर चर्चेमुळे चाहत्यांना हा व्हिडिओ प्रचंड आवडला असून, सोशल मीडियावरही तो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना आमिर खान प्रोडक्शन्सने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “यंग आणि क्रेझी व्हर्जन की परफेक्शनिस्टचा व्हिजन , कोणता कट बनेल फायनल कट? हे जाणून घेण्यासाठी उद्यापर्यंत थांबावं लागेल! हॅपी पटेल: खतरनाक जासूस’चा ट्रेलर उद्या रिलीज.” या घोषणेनंतर आता प्रेक्षकांची नजर थेट उद्याच्या ट्रेलर रिलीजकडे लागली आहे.

आमिर खान प्रोडक्शन्सने यापूर्वी लगान, तारे जमीन पर, दंगल, सीक्रेट सुपरस्टार यांसारखे सामाजिक आशय आणि मनोरंजन यांचा समतोल साधणारे चित्रपट दिले आहेत. त्यामुळे ‘हॅपी पटेल: खतरनाक जासूस’ हा चित्रपटही काहीतरी वेगळं आणि मजेशीर घेऊन येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

‘काही फरक पडत नाही..’ ‘धुरंधर’ चित्रपटामुळे होणाऱ्या कौतुकावर पहिल्यांदाच बोलला अक्षय खन्ना; आश्चर्यकारक उत्तर

वीर दास हे जागतिक पातळीवर लोकप्रिय असलेले स्टँड-अप कॉमेडियन असून, त्यांनी गो गोआ गॉन, बदमाश कंपनी, दिल्ली बेली यांसारख्या चित्रपटांतून अभिनयाचीही चुणूक दाखवली आहे. विशेष म्हणजे दिल्ली बेलीनंतर आमिर खान प्रोडक्शन्ससोबत त्यांची ही दुसरी भागीदारी आहे. आमिर खान प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘हॅपी पटेल: खतरनाक जासूस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन वीर दास यांनी केले असून, हा बहुप्रतिक्षित चित्रपट १६ जानेवारी २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तोपर्यंत मात्र, उद्या रिलीज होणाऱ्या ट्रेलरमधून ‘हॅपी पटेल’चा खरा रंग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Web Title: The video from aamir khan productions has increased the suspense for the happy patel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 04:56 PM

Topics:  

  • amir khan

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.