निस्तेज चेहरा अन् विस्कटलेले केस... डेंग्यू झाल्यानंतर टायगर श्रॉफला ओळखणंही झालं कठीण; पाहा Photo
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Actor Tiger Shroff) याची त्याच्या चाहत्यांमध्ये ॲक्शन हिरो म्हणून ओळख आहे. कायमच आपल्या फिटनेसमुळे चर्चेत राहणाऱ्या टायगरने इन्स्टाग्रामवर डेंग्यू आजारातून बरं झाल्यानंतरचा एका व्हिडिओ शेअर केलेला आहे. या आजारातून बरं झाल्यानंतरचा अभिनेत्याचा फोटो पाहून चाहते चिंतेत पडले आहेत. अभिनेत्याने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शर्टलेस फोटो शेअर केलेला आहे.
हुबेहूब इंदिरा गांधी… कंगना रणौतने माजी पंतप्रधानांच्या भूमिकेसाठी ‘अशी’ घेतली मेहनत; Video Viral
कायमच आपल्या अभिनयामुळे आणि फिटनेसमुळे चर्चेत राहणारा टायगर सध्या त्याच्या हेल्थमुळे चर्चेत आहे. अभिनेत्याला काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. अभिनेता आजारपणातून संपूर्ण बरा झाल्यानंतर इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ६ जानेवारीला अर्थात कालच अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शर्टलेस फोटो शेअर केला आहे. अभिनेत्याने प्रकृतीबद्दल माहिती देताना पोस्टमध्ये लिहिलंय की, “मी डेंग्यूतून बरा झाल्यावर एका दिवसानंतर काढलेला माझा फोटो आहे.” कोमेजलेला चेहरा, विस्कटलेले केसं आणि त्याची तब्येत पाहून चाहते त्याच्या तब्येतीची विचारपूस करताना दिसत आहेत.
शेअर केलेला फोटोपाहून इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, नेहमीच फिटनेस आणि आरोग्याला प्राधान्य देणाऱ्या टायगरला डेंग्यू सारखा गंभीर आजार होऊनही त्याचे ॲब्स कमालीचे शाबूत आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्याचे सिक्स ॲब्स अगदी स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. या अवस्थेतही त्याची शरीरयष्टी अगदी व्यवस्थित असून जी प्रशंसनीय आहे. टायगर श्रॉफचे हे फोटो पाहिल्यानंतर चाहते त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. फोटो शेअर करताना अभिनेत्याने सांगितले की, त्याला नुकताच डेंग्यू झाला होता, पण आता त्याची तब्येत व्यवस्थित आहे.
टायगर श्रॉफच्या कामाबद्दल बोलायचे तर, तो लवकरच ‘बागी ४’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट येत्या ५ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटात टायगरसोबत संजय दत्तही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अलिकडेच टायगर हा ‘सिंघम अगेन’ मध्ये झळकला होता. ज्यामध्ये त्याची सहायक भूमिका होती. त्यापूर्वी अभिनेत्याचा ‘बड़े मियाँ छोटे मियाँ’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता, तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.