
Rashmika Mandanna च्या 'The Girlfriend' चित्रपटाचा Trailer प्रदर्शित! (Photo Credit - X)
The Girlfriend Trailer Release: ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाणारी साउथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) सध्या तिच्या ‘द गर्लफ्रेंड’ (The Girlfriend) या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. या रोमँटिक ड्रामा चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी शनिवारी (आज) हा २ मिनिटे ३९ सेकंदाचा ट्रेलर रिलीज केला, जो एका गहन आणि गुंतागुंतीच्या प्रेमकथेचे चित्रण करतो. यात प्रेम, वेदना आणि नात्यांमधील पेच स्पष्टपणे दिसतात.
चित्रपटात रश्मिका मंदान्ना ‘भूमा’ हे पात्र साकारत आहे, तर धीक्षित शेट्टी ‘विक्रम’च्या भूमिकेत आहे. ट्रेलरची सुरुवात ‘भूमा’ (रश्मिका) तिचा बॉयफ्रेंड ‘विक्रम’ला, “आपण थोडा ब्रेक घेऊ शकतो का?” असे विचारते, यावर विक्रम रागात उत्तर देतो, “ब्रेकचा अर्थ एका गोष्टीपासून ब्रेक घेणे आहे.”
५२ व्या वर्षी मलायका पुन्हा लग्न करणार? लग्नाविषयी बोलताना अभिनेत्री म्हणाली, ”मला प्रेमावर…”
ट्रेलरमध्ये विक्रम एक ‘टॉक्सिक’ (विषारी), वर्चस्व गाजवणारा आणि संशयी बॉयफ्रेंड दाखवला आहे, जो नात्यावर पूर्ण नियंत्रण ठेवू इच्छितो. याउलट भूमा एक शांत आणि साधी मुलगी आहे, जी या नात्याच्या दबावाखाली गुदमरत आहे. एका भावनिक फ्लॅशबॅकमध्ये विक्रम भूमाला अचानक लग्नाची मागणी घालतो, ज्याच्या घाईमुळे भूमा अस्वस्थ वाटते.
चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन राहुल रविंद्रन यांनी केले आहे. हेशाम अब्दुल वहाब यांनी संगीत दिले आहे, तर कृष्णन वसंत यांनी सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी सांभाळली आहे. चित्रपटात रश्मिका मंदान्ना, धीक्षित शेट्टी यांच्यासोबत राव रमेश आणि रोहिणी मुख्य भूमिकांमध्ये आहेत. हा चित्रपट तेलुगू व्यतिरिक्त हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. ‘द गर्लफ्रेंड’ ७ नोव्हेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार असून, प्रेक्षकांना विचार करायला लावणारा प्रेमाचा एक वेगळा अनुभव देईल.
Bigg Boss 19 मध्ये पलटला खेळ! एकाच वेळी बाहेर गेले दोन मजबूत खेळाडू, चाहत्यांना मोठा धक्का