vaibhav tatwawadi and pooja sawant
कलाकारांच्या काही जोड्या खूप हीट होतात. मोठ्या पडद्यावर झळकलेल्या अशा काही जोड्या आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. वैभव तत्ववादी (Vaibhav Tatwawadi) आणि पूजा सावंत (Pooja Sawant) ही त्यापैकीच एक जोडी आहे. प्रेक्षकांची मने जिंकलेली ही जोडी परत एकत्र कधी येणार? याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये कायमच उत्सुकता असतेच. वैभव आणि पूजा या जोडीच्या चाहत्यांसाठी (Vaibhav And Pooja To Work Together) एक खुशखबर आहे.
‘हॅण्डसम’ वैभव तत्ववादी आणि ‘ब्युटीफुल’ पूजा सावंतची लव्हेबल केमिस्ट्री परत एकदा जुळणार आहे. पण ही जोडी कशासाठी एकत्र येतेय ? हे अजूनही गुलदस्त्यात आहे. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेमामुळे या दोघांनी पुन्हा एकत्र काम करणार असल्याचे संकेत दिले आहेत.
चित्रपट, अल्बम, जाहिरात यापैकी कोणत्या माध्यमातून ही जोडी एकत्र येणार याची खूप उत्सुकता शिगेला पोहोचली असली तरी बऱ्याच कालावधीनंतर ही जोडी एकत्र येणार असल्याने चाहत्यांना नक्कीच आनंद होणार आहे. लवकरच हे दोघे त्यांच्या या आगामी प्रोजेक्टची घोषणा करणार आहेत.