vikram gokhale photo
पुणे: विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांच्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली (Vikram Gokhale Health Update) आहे.ते डोळे उघडत आहेत तसेच त्यांच्या हात आणि पायांची देखील हालचाल होत असल्याची माहिती मिळाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पुढील ४८ तासांत त्यांचा व्हेंटिलेटर काढला जाऊ शकतो. त्यांचा रक्तदाब आणि हृदयाची क्रिया स्थिर असल्याचं शिरीष याडगीकर यांनी सांगितलं. विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
[read_also content=”शेअर बाजारात आज घसरण, सेन्सेक्स आणि निफ्टीबद्दल जाणून घ्या https://www.navarashtra.com/business/share-market-down-sesex-fall-by-112-and-nifty-by-29-nrsr-348116.html”]
विक्रम गोखले यांचे स्नेही राजेश दामले म्हणाले की, कालपासून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र डॉक्टरांचे सध्या प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत आम्ही माहिती देतच राहू.कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. जोपर्यंत डॉक्टर माहिती देत नाहीत तोपर्यंत पुढे काही सांगू शकत नाहीत. कोणी जर अफवा पसरवत असेल तर त्यांना थांबवा,अस अवाहनही त्यांनी केलं आहे.
तसेच विक्रम गोखले यांची पत्नी वृषाली यांनी सांगितलं की, विक्रम गोखले यांच्यावर ५ नोव्हेंबरपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची तब्येत थोडी बरी झाली होती पण पुन्हा त्यांची तब्येत खालावली. त्यांना हृदय आणि किडनी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.