केजीएफच्या मेकर्सने हृतिक रोशनसोबत केली हातमिळवणी, 'वॉर २'पेक्षाही करणार जबरदस्त ॲक्शन
बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ म्हणून अभिनेता हृतिक रोशनची ओळख आहे. हृतिक रोशनने २००० मध्ये ‘कहो ना प्यार है’ चित्रपटाच्या माध्यमातून इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करत आपल्या फिल्मी करियरला सुरुवात केली. नुकताच हृतिक रोशनचा ५१ वा वाढदिवस झाला. प्रेमाची परिभाषा सांगणाऱ्या ह्या चित्रपटामध्ये हृतिक रोशनसोबत अमिशा पटेलही प्रमुख भूमिकेत होती. सध्या हा चित्रपट चर्चेत येण्याचं कारण म्हणजे, चित्रपटाला रिलीज होऊन आज २५ वर्षे झाली आहेत. चित्रपट रिलीज होऊन आज इतकी वर्षे होऊनही चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये कायम आहे. सध्या सोशल मीडियावर हृतिक रोशनचं एक पत्र व्हायरल होत आहे. अभिनेत्याने २७ वर्षांपूर्वी पत्र लिहिलेला डायरीचा फोटो एक्सवर शेअर केला आहे.
हृतिक रोशनचा पहिला चित्रपट म्हणून ‘कहो ना प्यार है’ चित्रपटाकडे पाहिलं जातं. हा चित्रपट रिलीज होऊन आज २५ वर्षे झाली आहेत. १४ जानेवारी २००० मध्ये रिलीज झालेल्या ह्या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये अजूनही क्रेझ कायम आहे. २५ वर्षानिमित्त आज हा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये रि- रिलीज होणार आहे. हृतिक रोशनने करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमधील आठवणी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. जवळपास २७ वर्षापूर्वी हृतिकने लिहिलले खास डायरीचा फोटो एक्सवर (ट्वीटर) पोस्ट केला आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने आपल्या अनेक जुन्या आठवणींनाही उजाळा दिला आहे.
जुन्या डायरीचा फोटो शेअर करताना पोस्टमध्ये हृतिकने लिहिलंय की, “माझे २७ वर्षांपूर्वीचे पत्र… ‘कहो ना प्यार है…’ माझा पहिला चित्रपट होता. या चित्रपटादरम्यान मी एक अभिनेता म्हणून तयारी करत असताना मी तेव्हा खूप नर्व्हस असायचो. अजूनही मी कोणत्याही नवीन चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात करतो तेव्हाही मला असंच वाटतं. डायरीत लिहिलेले हे पत्र शेअर करताना मला लाज वाटतेय. पण गेले २५ वर्ष मी इंडस्ट्रीत आहे, त्यामुळे मी आता सगळं सहज हाताळू शकेल, असं मला वाटतं. ” हृतिकने शेअर केलेल्या पोस्टवर वडिलांनी कमेंट केलीये की, ‘डुग्गू (हृतिकचे टोपणनाव), मीही हे पहिल्यांदाच पाहत आहे. पण खूप छान आहे.’
मुरलेल्या प्रेमाचा गोडवा देणाऱ्या ‘गुलकंद’चा हटके मोशन पोस्टर रिलीज, हास्यजत्रेची टीमकडून चाहत्यांना
पुढे हृतिकने या पोस्टमध्ये त्याच्या फिल्मी करिअरमध्ये घडलेल्या अविस्मरणीय गोष्टींबद्दल चाहत्यांचे आभार देखील मानले आहेत. त्यावर अभिनेत्याने म्हटलंय, “आज ‘कहो ना प्यार है…’ चित्रपट प्रदर्शित होऊन २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. मला फक्त या जुन्या नोट्स तुम्हाला दाखवायच्या आहेत. या नोट्समुळे एका गोष्टीने मला समाधान मिळतं. मी पहिल्याच पानावर लिहिलंय की, तसा दिवसच पुन्हा कधी अनुभवायला मिळाला नाही. परंतु मी ते क्षण मिस केले. कारण त्यावेळी मी फक्त आणि फक्त तयारी करण्यात व्यस्त असायचो.” अशी पोस्ट त्याने शेअर केली आहे. हृतिक रोशनने त्याच्या अपकमिंग डॉक्युमेंट्रीच्या निमित्त दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, माझ्याकडे कोणी जास्त लक्ष दिलेलं मला आवडत नाही. ‘ग्रीक गॉड’ नावाने प्रसिद्ध असलेल्या हृतिकने पत्रकार परिषदेत त्याच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.