फोटो सौजन्य - Social Media
अनेकदा अभिनेते सचिन पिळगावकर तसेच अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी अभिनेत्री श्रिया पिळगावकर दत्तक घेतलेली मुलगी असल्याचे दावे अनेक जणं करतात. अनेकांना कदाचित असे बऱ्याचदा कानी ही आले असेल की श्रिया त्यांची दत्तक घेतलेली मुलगी आहे. पण सचिन यांनी अनेकदा हे स्पष्ट केले आहे की श्रिया त्या दोघांची सख्खी मुलगी आहे. तसेच त्यांच्या आयुष्यात दत्तक मुलगीही होती, पण ती अधिकृतरित्या दत्तक नसल्याने काही कारणामुळे ती त्यांच्यापासून दुरावली.
नक्की काय घडलं? अन् कोण आहे पिळगावकर जोडप्याची दत्तक मुलगी?
अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांच्या दत्तक मुलीचे नाव करिष्मा मखनी आहे. अधिकृतरीत्या याची नोंदणी नसल्याने ही त्यांची दत्तक मुलगी आहे असे सांगणे योग्य ठरणार नाही पण त्या दोघांनी करिष्मा म्हणजेच किट्टूला जिव्हाळा आणि आईबापाचे प्रेम दिले आहे. किट्टूची आई लहान असतानाच मृत्यमुखी पडली. तिच्या निधनानंतर तिचे बाबा सतत किट्टूसह हॉटेलमध्ये असत. किट्टू तशी श्रीमंत घरातून होती. तिचे बाब सचिन पिळगावकरांचे घट्ट मित्र होते. सचिन यांना किट्टूचे होणारे हाल पाठवले नाही, त्यामुळे त्यांची पत्नी सुप्रियाने देखील किट्टूला आपल्यासोबत ठेवण्याचा निर्णय घेतला. किट्टू अगदी तीन ते चार वर्षांची असल्यापासून त्यांच्याकडे होती.
दरम्यान, सचिन पिळगावकर आणि किट्टूच्या वडिलांनीं किट्टू फिल्म्स नावाची एक कंपनी सुरु केली होती, पण ही कंपनी फार काही जास्त काळ टिकली नाही. यानंतर तिच्या बाबांनी किट्टूला लंडनला घेऊन गेले. लहानपणापासून अगदी हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली पोर जरी पोटाची नसली तरी आईबापाचे प्रेम देऊन वाढवलेली पोर, कसलीही पूर्वकल्पना नसताना त्यांच्यापासून दूर गेली, याचा मोठा धक्का पिळगावकर कुटुंबियांना बसला. त्यांनी किट्टूच्या बाबांवर किडनॅपिंगचा आरोपही केला. पण किट्टूच्या कुटुंबीयांनी ते सर्व आरोप खोटे असल्याचा दावा केला. काही वर्षांनी किट्टू अभिनयासाठी पुन्हा मुंबईत आली. पिळगावकरांनी तिला पुन्हा स्वीकारलं. ती त्यांच्याकडेच वास्तव्यास होती, परंतु कामाची शिस्तबद्ध नसल्यामुळे किट्टू या क्षेत्रात फार काही टिकली नाही आणि पुन्हा लंडनकडे निघाली.
दरम्यान, त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये त्यांची मुलगी अभिनेत्री श्रिया पिळगावकर खरी मुलगी असल्याचे सांगितले आहे. तसेच लोकांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.