y marathi movie
सत्य घटनांवर आधारित ‘वाय’ (Y) हा चित्रपट येत्या २४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कन्ट्रोल-एन प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाची घोषणा नुकतीच सोशल मीडियावर करण्यात आली आहे. अजित वाडीकर (Ajit Wadikar) दिग्दर्शित ‘वाय’ या चित्रपटात मुक्ता बर्वेची (Mukta Barve) प्रमुख भूमिका आहे.
[read_also content=”मुंबईच्या गल्लीबोळातल्या आगीवरही ठेवता येणार नियंत्रण, अग्नीशमन दलाच्या ताफ्यात फायर बाईक दाखल https://www.navarashtra.com/maharashtra/fire-bikes-added-in-fire-brigade-department-of-mumbai-nrsr-268121.html”]
पोस्टरमध्ये मुक्ताच्या संघर्षपूर्ण डोळ्यांत खंबीरपणे लढण्याची ताकद दिसत असून आजुबाजूला आगीचे लोळ दिसत आहेत. तर लाल रंगाच्या ‘वाय’ मध्ये ग्लोव्हस घातलेले हात वैद्यकीय हत्यार हाताळताना दिसत आहे. पोस्टरवरून हा चित्रपट महत्वपूर्ण विषयावर भाष्य करणारा दिसत आहे.
चित्रपटाच्या ‘वाय’ या शिर्षकाच्या पार्श्वभागी असणाऱ्या WHY या इंग्रजी अक्षरामुळे ही चित्रपटाच्या आशय आणि विषयाबद्दल उत्सुकता निर्माण झालेली आहे. ‘वाय’ एक दमदार कथा आणि आशय घेऊन प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे दिसत आहे.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अजित वाडीकर म्हणतात, “सत्य परिस्थिती दाखवणारी, आजच्या काळात घडणारी ही कथा आहे. या भूमिकेसाठी मुक्ता शिवाय दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्रीचा विचार माझ्या मनात नव्हता. मला खात्री आहे, या चित्रपटाला तुम्ही भरपूर प्रतिसाद द्याल.’’