रामायणातील दाखल्यांनुसार रावण अनेक ठिकाणी त्याच्या कृत्यांसाठी बदनाम आहे. असे असले तरी त्याच्या नितिमत्ता आणि वर्तन यांना काही गुण आपल्याला नक्कीच द्यावे लागतील. रावण हा राक्षसांचा राजा होता. त्याने केलेल्या चुकीच्या वर्तनाची शिक्षा म्हणून प्रभू रामचंत्रांनी त्याचा वध केला. त्याची आठवण म्हणून दसरा म्हणजेच विजयादशमी या दिवशी रावण दहन केले जाते. असे असले तरी रावण दहन जरुर करावे. परंतू, त्याच्याकडून जीवनात महत्त्वाचे ठरतील असे काही गुणही घ्यायला हवेत. रावणाकडील गुण नेमके कोणते? घ्या जाणून.
रावणाचे महत्त्वाचे विचार
वाल्मिकींनी रावणाचे वर्णन भगवान शिवाचा महान भक्त असे केले आहे. रामकथा आणि रामकीर्ती यांसारख्या महाकाव्याच्या अनेक लोकप्रिय आवृत्त्यांमध्ये, उल्लेख आढळतो की, रावणाने तपस्वी देवता भगवान शिव यांच्या स्तुतीसाठी रुद्र स्तोत्र रचले. काम (वासना), क्रोध , लोभ, मोह, मद, मत्सर (इर्ष्या), अहंकार, चित्त, मानस (हृदय), बुद्धी ही त्यांची दहा डोकी होती. दहा डोक्यावरून दहा. असा रावण दहा गुणांचा आहे, हीच रावणाची बुद्धी आहे. तुम्ही स्वत:ला या अलौकिक सवयी लावू शकता आणि जीवनात उंची गाठू शकता.