युरिक अॅसिडचा त्रास हल्ली बऱ्याच जणांना होताना दिसून येत आहे आणि याचे काही ठराविक वयदेखील नाही. मात्र त्वरीत शरीरातून युरिक अॅसिड काढायचे असेल तर हे वाचाच
गुळवेल हे युरिक अॅसिड नियंत्रित करण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. यात अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म असून सांध्यांच्या सूज आणि वेदनापासून आराम मिळतो. यासाठी तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी गुळवेलाचा रस सेवन करावा
तुळशीच्या पानांमध्ये अँटीइन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असून युरिक ॲसिडची पातळी कमी होण्यास मदत होते. तुम्ही 4-5 तुळशीची पाने सकाळी चावावी वा तुळशीचा चहा रिकाम्या पोटी प्यावा
हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीसेप्टीक गुण असून सांधेदुखी आणि सूज दूर होण्यास मदत मिळते. तुम्ही 1 ग्लास गरम दुधात अर्धा चमचा हळद टाकून रोज रात्री झोपण्यापूर्वी पिण्याने फायदा मिळेल
हरितकी, विभितकी आणि आवळा यांचे मिश्रण असणारे त्रिफळादेखील उत्तम ठरते. त्यात अमिनो ॲसिड आणि फ्लेव्होनॉइड्स यूरिक ॲसिडची पातळी कमी करतात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा त्रिफळा पावडर एक ग्लास कोमट पाण्यासोबत सेवन करावे
कडुलिंबात अँटीइन्फ्लेटरी गुण असून सांधेदुखी कमी होते. युरिक ॲसिड नियंत्रित करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा आणि सालाचा काढा करून पिऊ शकता