प्रोटीन हे फक्त मांसाहारी पदार्थांमधून मिळते असं अजिबात नाही. काही शाकाहारी पदार्थांमधून तुम्हाला मांसाहारी पदार्थांपेक्षा अधिक प्रमाणात प्रोटीन मिळते. याबाबत अधिक माहिती आपण घेऊया
कडधान्ये भारतीय स्वयंपाकघरातील महत्त्वाचा भाग मानली जातात. त्यामध्ये प्रथिने चांगल्या प्रमाणात आढळतात. मटार, मसूर, मूग आणि उडीद डाळ याशिवाय राजमामध्येही भरपूर प्रथिने आढळतात
सुका मेवा आणि बियांमध्येही भरपूर प्रथिने असतात. बदाम, अक्रोड, चिया सीड्स आणि भोपळ्याच्या बियांमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसे दही, चीज आणि ताक यातदेखील भरपूर प्रथिने असतात. याशिवाय यामध्ये कॅल्शियमदेखील असते
शाकाहारी अन्नामध्ये सोयाबीनला प्रोटीन किंग म्हटले जाते. टोफू आणि सोया चंक्ससारखी सोया उत्पादने शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहेत. लोक सोया हे भाजी, कोशिंबीर किंवा स्नॅक्स म्हणून खातात
क्विनोआ, ओट्स आणि तपकिरी तांदूळ यांसारख्या धान्यांमध्येही प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. लोक हे धान्य प्रामुख्याने नाश्ता म्हणून वापरतात