अभिनेत्री अनन्या पांडे ही बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने करन जोहरच्या स्टुडन्ट ऑफ द इयर २ या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं.
अनन्या पांडे हिला खूप कमी कालावधीतच चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले.
अनन्या पांडे ही सोशल मीडियावर देखील ऍक्टिव्ह असून ती नेहमी तिच्या चाहत्यांसोबत तिचे फोटोस आणि अनेक खास प्रसंग शेअर करीत असते.
अनन्याच्या या फोटोंवर चाहते कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करीत आहेत. अनन्या पांडे ही एक स्टार कीड असून बॉलिवूडमधील अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी आहे. अनन्याचे इंस्टाग्रामवर २४ मिलियन फॉलोवर्स आहेत.