Raashii Khanna Beauty
अभिनेत्री राशी खन्ना सध्या ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
अभिनेत्री सध्या चित्रपटादरम्यान चर्चेत असून तिने सोशल मीडियावर ग्रीन ड्रेस वेअर करून एका पेक्षा एक हटके अंदाजात फोटोशूट केले आहे.
शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्रीने निसर्गाच्या सान्निध्यातले सुंदर फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लूकचे आणि सौंदर्याचे कौतुक केले जात आहे.
स्मोकी मेकअप, ग्लॉसी आईज्, न्यूड लिपस्टिक आणि लूकला साजेसे दागिने कॅरी करून अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर हटके फोटोशूट केले आहे. "निसर्गाशी एकरूप" असं कॅप्शन देत अभिनेत्रीने फोटोज् शेअर केले आहेत.
निसर्गाशी एकरूप केलेला ड्रेस वेअर करून राशी खन्ना 'बिग बॉस १८'च्या घरात प्रमोशनसाठी जाणार आहे. स्टायलिश ग्रीन ड्रेस आणि दुपट्टा कॅरी करून अभिनेत्री शोमध्ये हजेरी लावणार आहे.
राशी खन्नाने शेअर केलेल्या फोटोंवर तिच्या सौंदर्याचे कौतुक करत कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अभिनेत्रीच्या फोटोवर काही तासांतच २ लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.