शनि हा असा ग्रह आहे की त्याचं नाव घेतल्यानंतरही अनेकांचे पाय थरथरू लागतात. नक्की आयुष्यात काय संकटं घेऊन शनि येईल याची कल्पना कोणालाच नसते. मात्र 15 नोव्हेंबरनंतर शनि मार्गी होणार असून त्याचे पाच राशींना फायदे मिळणार आहेत
मेष राशीच्या लोकांच्या करिअरसाठी हा काळ चांगला जाणार आहे. व्यापारी वर्गातील लोकांना नवीन डील मिळणार आहेत आणि यामुळे त्यांना नफाही मिळेल. समाजातही तुम्हाला मान-सन्मान मिळेल. कौटुंबिक संबंध दृढ होतील. आई-वडिलांच्या आशीर्वादाने कामं पूर्ण होतील. एखादे काम प्रलंबित असेल तर ते पूर्ण करून त्यात उत्तम यश मिळेल
कर्क राशीच्या व्यावसायिकांसाठी काळ अनुकूल आहे. जे लोक गुंतवणुकीचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी 15 नोव्हेंबरनंतर येणारी वेळ ही अनुकूल आहे. तसंच या व्यक्तींना भविष्यात चांगला परतावा मिळेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीची दारे खुली होतील. सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल
कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत असेल. जर तुम्ही दीर्घकाळासाठी कोणतेही कर्ज घेतले असेल तर ते यावेळी परत केले जाऊ शकते. कोर्टाशी संबंधित कामात यश मिळेल. मानसिक तणाव दूर होईल आणि सकारात्मकता राहील. जर तुम्हाला कोणत्याही आजाराने ग्रासले असेल तर ते दूर होऊ शकते आणि तुमचे आरोग्य सुधारेल
मकर राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या समस्या दूर होतील. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना त्यांच्या इच्छित नोकरीची ऑफर मिळू शकते. आर्थिक स्थितीतही सुधारणा होईल. वैवाहिक जीवनातील समस्यांपासून सुटका मिळेल. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होऊ शकते
कुंभ राशीच्या लोकांसाठी शनिचे भ्रमण शुभ राहील. व्यावसायिकांची आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरदारांचे प्रश्न सुटतील. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर वेळ चांगली आहे, भविष्यात तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीची दारे खुली होतील