घाम प्रत्येकालाच येतो मात्र अनेकांना घाम आल्यानंतर अंगाला एक दुर्गंधी येते आणि ती इतरांना सहन करणंही अशक्य होतं. तुमच्याही शरीराला घाम आल्यानंतर दुर्गंधी येत असेल तर सोपा उपाय करा
घामाच्या दुर्गंधीने त्रास होत असेल तर तुरटी आणि मीठ वापरा. यासाठी तुम्हाला फक्त अंघोळ करण्यापूर्वी पाण्यात तुरटी आणि मीठ मिसळावे लागेल. त्याबरोबर स्नान करा. असे केल्याने घामाच्या दुर्गंधीपासून आराम मिळतो
तुरटी आणि मीठ एकत्र वापरल्याने व्यक्ती अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्त होऊ शकते. दोन्हीच्या मिश्रणाने शरीरात निर्माण होणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात
तुरटी आणि मीठ दात आणि हिरड्यांसाठी खूप उपयुक्त आहे. याच्या वापराने हिरड्यांना सूज येणे, हिरड्या दुखणे, तोंडाचे व्रण यावर नियंत्रण ठेवता येते
जखमेतून रक्तस्राव थांबत नसेल तर जखमेवर तुरटी पावडर शिंपडा. असे केल्याने रक्तस्त्राव थांबतो. याशिवाय जखमेला संसर्गापासूनही वाचवता येते
तुरटीला भेगा पडलेल्या टाचांवर रामबाण उपाय म्हणतात. गरम पाण्यात तुरटी आणि मीठ मिसळा. त्यानंतर काही काळ पाय त्यात ठेवा. असे केल्याने भेगा पडलेल्या टाचा मऊ होतील. त्यानंतर घासून स्वच्छ करा