अरबाजने साजरा केला निकीचा वाढदिवस. (फोटो सौजन्य - Social Media)
२१ ऑगस्ट रोजी अभिनेत्री निकी तांबोळीचा वाढदिवस असतो. तिच्या या स्पेशल दिनानिमित्त सिनेसृष्टीतून अनेक हस्तींनी तिला शुभेच्छा दिल्या.
तिच्या चाहत्यामंडळींनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, निकीने तिच्या सोशल मीडियावर काही खास क्षण शेअर केले आहेत.
ती तिच्या बॉयफ्रेंड अरबाज पटेलसह तिचा हा स्पेशल दिन साजरा करत होती. तिने पोस्ट केलेल्या क्षणांमध्ये त्या दोघांमध्ये असलेली जवळीक स्पष्ट दिसत आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टखाली त्या दोघांच्या चाहतेमंडळींनी भरभरून कमेंट्स केले आहेत. एका चाहत्याने 'निकी तू किती क्युट आहेस' असे म्हंटले आहे.
तर काही चाहत्यांना त्या दोघांना मोठ्या पडद्यावर पाहायचे आहे. काहींनी अरबाजचे मजे असून त्याचे नशीब किती चांगले असल्याचे सांगितले आहे.