या आहेत ७० हजाराच्या बजेटमध्ये बेस्ट बाईक्स. (फोटो सौजन्य - Social Media)
हिरो एचएफ डिलक्स या दुचाकीची एक्स-शोरूम किंमत ₹५९,९९८ ते ₹६९,०१८ दरम्यान आहे. मायलेजसाठी ही बाईक खूपच प्रसिद्ध आहे.
होंडा शाइन 100 या दुचाकीची एक्स-शोरूम किंमत ₹६४,९०० आहे. होंडा शाइन ही बाजारात लोकप्रिय असलेली विश्वसनीय बाईक आहे.
टीव्हीएस एक्सएल 100 या दुचाकीची एक्स-शोरूम किंमत ₹४४,९९९ ते ₹६०,९०५ आहे. कमी बजेटमध्ये उत्तम परफॉर्मन्स देणारी बाईक म्हणून या गाडीकडे पाहिले जाते.
बजाज प्लॅटिना 100 या दुचाकीची एक्स-शोरूम किंमत ₹६८,६८५ आहे. ही बाईक मायलेज आणि आरामासाठी ओळखली जाते.
हिरो एचएफ 100 या दुचाकीची एक्स-शोरूम किंमत ₹५९,०१८ आहे. देशातील सर्वोत्तम मायलेज देणाऱ्या दुचाकींमध्ये या बाईकची गणना होते.