MBA च्या 'या' शाखा करवून देतील लाखोंची कमाई. ( फोटो सौजन्य - Social Media )
इंटरनॅशनल बिजनेस MBA - परदेशातील कंपन्यांमध्ये व्यापार व्यवस्थापनासाठी मागणी असलेली शाखा. जगभरात विविध बाजारपेठेत काम करून लाखोंची कमाई करता येते.
फायनान्स MBA - आंतरराष्ट्रीय बँका आणि आर्थिक संस्थांमध्ये गुंतवणूक आणि वित्त व्यवस्थापनाचे तज्ञ म्हणून नोकऱ्या मिळवा. परदेशात फायनान्स क्षेत्रात मोठ्या पगाराची संधी.
मार्केटिंग MBA - परदेशातील मोठ्या कंपन्यांमध्ये मार्केटिंग स्ट्रॅटेजी तयार करण्यासाठी आवडती शाखा. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मार्केटिंगच्या भूमिकेतून उंच पगार मिळवू शकता.
ऑपरेशन मॅनेजमेंट MBA - उत्पादन, लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन व्यवस्थापनासाठी परदेशात मोठ्या संधी. उद्योगांच्या कार्यक्षमतेत वाढ करून लाखोंची कमाई करता येते.
HR MBA - परदेशातील कंपन्यांमध्ये मानव संसाधन व्यवस्थापनाचे कौशल्य वापरून उच्च पगाराच्या संधी. कर्मचारी व्यवस्थापनात तज्ञ होऊन विविध देशात काम करता येते.