'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणे केला साखरपुढा, हटके अंदाजात गर्लफ्रेंडला केले प्रपोज (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणेने नुकताच त्याच्या गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा उरकला. त्याचे फोटोसुद्धा समोर आले आहेत.
जयच्या गर्लफ्रेंडचं नाव हर्षला पाटील आहे. जयने हर्षलाला फिल्मी स्टाईलने प्रपोज केलं असल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. तसेच अभिनेत्याला अनेक कलाकार शुभेच्छा देत आहेत.
हर्षला पाटील ही जयची गर्लफ्रेंड असून ती व्हिडीओ क्रिएटर आहे. इन्स्टाग्रामवर तिचे १ लाख ७५ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. तसेच तिचा चाहता वर्ग देखील जास्त आहे.
जयच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे २९ एप्रिल रोजी शुभेच्छा देताना हर्षलाने पाठमोऱ्या असलेल्या जय सोबत काही फोटो शेअर करून चाहत्यांना चकित करून टाकले होते.
त्यानंतर जयने देखील ती त्याची गर्लफ्रेंड असल्याचे चाहत्यांना सांगितले. हर्षला पाटील अगोदर जय दुधाणे सिमरन बावाला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र या बातमीत कुठलंच तथ्य नसल्याचं समोर आले होते.