Sonali Seygall Baby Bump Photos
'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री सोनाली सहगल लवकरच गोंडस बाळाला जन्म देणार आहे. अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वीच तिने प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. तेव्हापासून नेहमीच तिच्या सोशल मीडिया पोस्टची जोरदार चर्चा होत आहे.
अभिनेत्रीने काही तासांपूर्वीच सोशल मीडियावर चाहत्यांसोबत मॅटर्निटी फोटोशूट शेअर केले आहे. सध्या तिच्या फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असून फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
काही तासांपूर्वीच अभिनेत्रीने हे सुंदर फोटोशूट शेअर केले आहे. तिने तिच्या श्वानासोबत खूप सुंदर फोटोशूट केले आहे. तिने दिलेल्या फोटो पोजेसची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
"मोठा भाऊ शमशेर छोट्या भावाच्या प्रतिक्षेत आहे...", असं कॅप्शन देत सोनालीने बेबीबंपचे फोटोज् शेअर केलेले आहेत.
अभिनेत्री ऑगस्ट २०२४ मध्ये प्रग्नेंसीची घोषणा केली होती. तेव्हापासून सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटोशूट शेअर करताना दिसली आहे. ती येत्या डिसेंबर महिन्यामध्ये चाहत्यांना गोड बातमी देणार आहे.
सोनाली सहगलच्या पतीचे नाव आहे आशेष सजनानी आहे. दोघांचाही जून २०२३ मध्ये विवाह झाला होता.