लग्नाच्या 30 दिवस आधीपासूनच दररोज 1 तास रडते नवरी! या ठिकाणी आहे अजब परंपरा
चीनच्या तुझिया समुदायात लग्नापूर्वी एक विचित्र परंपरा पाळली जाते, ज्याला ‘क्राईंग वेडिंग कस्टम’ म्हणतात. या परंपरेत, वधूला लग्नाच्या 30 दिवस आधी दररोज एक तास रडण्यास सांगितले जाते.
क्राईंग वेडिंग कस्टम ही परंपरा ही संस्कृतीचा एक विशेष आहे. तसेच समाजातील नातेसंबंध, प्रेम आणि भावना व्यक्त करण्याची एक विशेष पद्धत आहे.
तुजिया समुदाय चीनच्या नैऋत्य प्रदेशात वसलेला आहे. ज्यात हुबेई, हुनान आणि गुइझोउ प्रांतांचा समावेश आहे. हा समुदाय त्याच्या विशिष्ट सांस्कृतिक परंपरा आणि रीतिरिवाजांसाठी ओळखला जातो, ज्यामध्ये लग्नाच्या अनोख्या शैलींचा समावेश आहे.
क्राईंग वेडिंग कस्टम ही वधूला भावनिक आणि मानसिकदृष्ट्या तयार करण्याचा एक मार्ग मानली जाते. तुझिया लोक प्रत्येक कार्यक्रमात पारंपारिक पद्धतींचे पालन करतात.
ही परंपरा लग्नाच्या 30 दिवस आधी सुरू होते. ही परंपरा वधूच्या कुटुंबात पाळली जाते. या वेळी दररोज वधू तासभर रडते आणि या वेळी कुटुंबातील सदस्य, विशेषतः महिला एकत्र गातात. ही गाणी अनेकदा जुनी पारंपारिक गाणी असतात.
पहिल्या दिवशी, वधू एकटी रडत नाही, तर तिची आई आणि आजी देखील तिच्यासोबत गातात. हे सुरुवातीचे दिवस खूपच भावनिक असतात. एक महिना रडण्याच्या परंपरेत, वधूच्या कुटुंबाला नातेवाईक आणि मित्रांकडून आधार दिला जातो. दररोज या परंपरेसह, वधूला एकत्रितपणे कुटुंब आणि समुदायाचा पाठिंबा आणि प्रेम प्राप्त होते.