
प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत नामिबियामधून आठ चित्ते आज भारतात आणण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोंदींच्या हस्ते या चित्त्यांना अभयारण्यात सोडण्यातं आलं.
हे आफ्रिकन चित्ते असून आता यांचा मुक्काम भारतात असणार आहे. नामिबिया येथून विशेष विमानानं या चित्त्यांचं भारतात आगमन झालं आहे.
यावेळी या चित्त्यांचा फोटो काढण्याचा मोह मोदींना नाही आवरता आला.
ग्वाल्हेर विमानतळावर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, गृहमंत्री नरोत्तम मिश्रा आणि राज्यपाल मंगूभाई पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत केले.