बीटगाजरचा रस पिण्याचे फायदे
त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी बीटरूट गाजरच्या रसाचे सेवन करावे. यामुळे त्वचेवरील पिंपल्स, ऍक्ने, पुरळ निघून जाऊन त्वचा स्वच्छ होते. या रसात असलेले गुणधर्म त्वचा चमकदार आणि सुंदर करण्यासाठी फायदेशीर आहेत.
शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी बीटरूट गाजरच्या रसाचे सेवन करावे. यामुळे शरीरात रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल बाहेर पडून जाते.
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. यामुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी बीटरूट गाजरच्या रसाचे सेवन करावे.
शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी गाजर बीटच्या रसाचे सेवन करावे. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
बीटमध्ये झिंक, लोह, फॉलिक ॲसिड, मँगनीज आणि विटामिन सी आढळून येते, ज्यामुळे त्वचेवर आलेल्या सुरकुत्या कमी होतात.