विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात या पदार्थांचे करा सेवन
आहारामध्ये सोयाबीन, टोफू, सोया मिल्क इत्यादी पदार्थांचे सेवन करावे., हे पदार्थ शरीराच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आणि प्रभावी आहेत. हे पदार्थ नियमित खाल्यास शरीराची ऊर्जा वाढण्यास मदत होते.
फोर्टिफाइड धान्यमध्ये विटामिन बी १२ मुबलक प्रमाणात आढळून येते. हा पदार्थ शाहाकारी लोकांसाठी अतिशय उत्तम आहे. त्यामुळे रोजच्या आहारात तुम्ही फोर्टिफाइड धान्याचे सेवन करू शकता.
रोजच्या आहारात माश्यांचे सेवन करावे. मासे खाल्यामुळे विटामिन बी १२ ची कमतरता भरून निघते. त्यामुळे आहारात सॅल्मन, टूना, आणि मॅकरेल इत्यादी मासे खावेत, ज्यामध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड्स आढळून येते.
विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी दूध, दही, चीज, तूप इत्यादी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे विटामिन बी १२ ची कमतरता भरून निघण्यास मदत होते.यामुळे स्नायू आणि हाडं बळकट होतात.
अंड्यांमध्ये मुबलक प्रमाणात विटामिन बी १२ आढळून येते. त्यामुळे नेहमी २ किंवा ३ उकडलेली अंडी खावीत. अंड खाल्यामुळे शरीराला मुबलक प्रमाणात विटामिन बी १२ आणि कॅल्शियम मिळते. अंड्यातील प्रथिने आणि फॅटी ऍसिड्स शरीराला पोषण देतात.