भारतात आयफोनची क्रेझ वाढली, EMI वर आयफोन खरेदी करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक (फोटो सौजन्य - pinterest)
आपल्याकडे 'उधार घेऊन तूप खा' अशी म्हण आहे. ही म्हण मोठ्या प्रमाणात वापरली जाते. उधार घेऊन आपले छंद पूर्ण करा असा या म्हणीचा अर्थ आहे. अशी काही अवस्था सध्या आयफोनच्या बाबतीत झाली आहे.
आयफोन हे आज स्टेटस सिम्बॉल बनले आहे. आयफोन एक प्रकारच्या श्रीमंतीचं प्रतिक बनला आहे. भारतातील बहुतांश तरुण EMI वर आयफोन खरेदी करतात.
YouTuber सागर सिन्हा यांनी दावा केला आहे की, भारतात 70% आयफोनची खरेदी EMI वर केली जाते. कारण आयफोनची किंमत प्रचंड असल्याने लोकं तो एकत्र पूर्ण पैसे देऊन खरेदी करू शकत नाहीत.
आयफोन आजच्या सर्वात महाग स्मार्टफोनपैकी एक मानला जातो, ज्यामुळे तो एक लक्झरी वस्तू बनतो. EMI वर आयफोनची खरेदी करता येत असल्यामुळे छोट्या विक्रेत्यांपासून ते व्यावसायिकांपर्यंतच्या लोकांसाठी आयफोन खरेदी करणे सोपे झाले आहे.
भारतात आयफोन युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा परिणाम ॲपलच्या भारतीय बाजारातील महसुलावरही दिसून येत आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारतातील कंपनीची कमाई 45 टक्क्यांनी वाढून 4 अब्ज डॉलर म्हणजेच 33,000 कोटी रुपये झाली आहे.
Apple चे सीईओ टिम कुक यांनी माहिती दिली होती की 2022 च्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत भारतात आयफोनची सर्वाधिक विक्री झाली आहे.