घरातील साहित्यांचा वापर करून बनवा मंगळागौरीची आकर्षक सजावट
पूजेसाठी आणलेली फुले बऱ्याचदा शिल्लक राहतात. या फुलांचा वापर करून तुम्ही मंगळागौरीच्या पूजेसाठी सजावट करू शकता. फुलांची सजावट अतिशय सुंदर वाटते.
पूजेच्या पाटावर चारीही बाजूने केळीची खांब लावून या पद्धतीने तुम्ही पाटावर पूजा मांडू शकता. याशिवाय पूजा मांडण्याच्या आधी पाटावर रंगीत कापड टाकावे. यामुळे तुमचे डेकोरेशन अधिकच सुंदर वाटेल.
प्रत्येकाच्या घरात दिवे उपलब्ध असतात. बऱ्याचदा शिल्लक राहिलेले दिवे फेकून दिले जातात. मात्र असे न करता सुंदर दिव्यांचे डेकोरेशन करून तुम्ही मंगळागौरीची पूजा मांडल्यास सगळेच तुमचे कौतुक करतील.
मार्गशीष महिन्यात देवीचे मुकुट लावून पूजा केली जाते. त्यामुळे मंगळागौरीच्या पूजेसाठी तुम्ही समई, किंवा नारळाचा वापर करून देवी तयार करू शकता. सुंदर दागिने आणि वस्त्र अतिशय उठावदार दिसेल.
घरातील कागदांचा वापर करून सुंदर असे कमळ तयार करून त्यात देवीची पूजा मांडता येईल. या पद्धतीने केलेले डेकोरेशन पाहून सगळेच तुमचं कौतुक करतील.