जेव्हा एखाद्या आरोपीला कोणत्याही गुन्ह्यासाठी अटक केली जाते, तेव्हा तो अंतरिम जामीन, जामीन आणि अटकपूर्व जामीन यासाठी अर्ज करू शकतो. पण अंतरिम जामीन, जामीन आणि अटकपूर्व जामीन या नेमका काय फरक आहे, असा आपल्याला नेहमी पडतो. अंतरिम जामीन, जामीन आणि अटकपूर्व जामीन यामध्ये नेमका काय फरक आहे, आज आपण जाणून घेऊया.
फोटो सौजन्य -iStock

एखादा आरोपी तुरुंगात असताना जामीन मिळवण्यासाठी कोर्टाकडे विनंती करतो. जामीन, अंतरिम जामीन आणि अटकपूर्व जामीन हे जामीनाचे प्रकार आहेत. पण अंतरिम जामीन , जामीन आणि अटकपूर्व जामीन यात फरक काय, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. आज या तिघांमधील फरक पाहूया.

एखाद्या व्यक्तीला कोर्टाने या उद्देशाने सोडले आहे की जेव्हा त्याला कोर्टाने बोलावले असेल किंवा त्याला हजेरीसाठी निर्देशित केले जाईल तेव्हा त्या व्यक्तिला कोर्टासमोर हजर राहावे लागेल. सोप्या शब्दात, असे म्हणता येईल की जामीन म्हणजे एखाद्या आरोपीची सशर्त सुटका.

जामीनामध्ये आरोपीकडून आवश्यकतेनुसार न्यायालयात हजर राहण्याचे वचन दिले जाते. काही लोकांना जामिनातून मुक्त होण्यासाठी दंड भरावा लागतो.

कोर्टाने हजर राहण्याचे आदेश दिल्यानंतर संबंधित व्यक्तिला तात्काळ कोर्टात हजर राहण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला जातो.

एखाद्या व्यक्तीला एखाद्या गुन्ह्याच्या आरोपाखाली अटक होणार असल्याचा संशय असल्यास अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला जातो. जर एखाद्या व्यक्तीला असे वाटत असेल की त्याला अशा गुन्ह्यात अडकवले जाऊ शकते जे त्याने कधीही केले नाही . या काळात त्याला अटकपूर्व जामीन मंजूर होऊ शकतो. अटकपूर्व जामीनाला इंग्रजीमध्ये अँटिसिपेटरी बेल म्हणतात.

अंतरिम जामीन हा अल्प मुदतीचा जामीन असतो. नियमित जामीन अर्जावर सुनावणी सुरू असताना एखादा आरोपी अंतरिम जामीन जामिनासाठी अर्ज करू शकतो. कोर्ट संबंधित आरोपीला ठराविक कालावधीसाठीच जामीन मंजूर करतं. हा कालवधी संपल्यानंतर आरोपीला पुन्हा तुरुंगात जावं लागतं.






