18000 कोटींची संपत्ती अन् भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर माहिती आहे का?
आंध्र प्रदेशातील तिरूपती जिल्ह्यातील डोंगरावर वसलेले श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिर जगातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे. हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित असून श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिर, तिरुमाला मंदिर, तिरुपती मंदिर आणि तिरुपती बालाजी मंदिर अशा वेगवेगळ्या नावांनी देशभर प्रसिद्ध आहे.
सध्या हे मंदिर तेथिल प्रसादामुळे फार चर्चेत आले होते. तिरूपतीच्या लाडूमध्ये चरबीचा वापर केला जात असेल्याचा खळबळजनक आरोप आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला. यानंतर इथल्या प्रसादावरून वाद निर्माण झाला होता.
या मंदिराने 1,031 किलोहुन अधिक सोनं जमा करून एक नवीन इतिहास रचला आहे. मंदिराचा एकूण सोण्याचा साठा 11,329 किलो या आकड्यावर गेला आहे.
या मंदिराअंतर्गत 75 ठिकाणी 6,000 एकर वनजमीन आणि 7,636 एकर स्थावर मालमत्तादेखील आहे. यापैकी 159 मालमत्ता भाडेतत्त्वावर असून, यातून वार्षिक 4 कोटी रुपयांचे उत्पन्न मंदिराला मिळते.
श्री व्यंकटेश्वर मंदिराला अनेक स्त्रोतांकडून उत्पन्न मिळतं असतं. यात भक्तांकडून अर्पण होणारे सोनं, देणग्या, मुदत ठेवींवरील व्याजाची रक्कम यांचा समावेश आहे. मंदिराच्या संपत्तीची ही रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे.