नात्याला मजबूत ठेवण्यासाठी या चुका टाळा. (फोटो सौजन्य - Social Media)
दैनंदिन धावपळीच्या जीवनात अनेकदा जोडीदाराला वेळ देता येत नाही. यामुळे नात्यात दूरावा निर्माण होतो. दिवसातून काही क्षण एकमेकांसाठी राखून ठेवा.
नात्यात संवादच नसेल तर गैरसमज वाढतात. मनातलं बोलणं, भावना शेअर करणं गरजेचं आहे. एकमेकांचं शांतपणे ऐका.
कधीकधी क्षुल्लक गोष्टींवरून मोठे वाद होतात. प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेणं टाळा आणि त्रासदायक गोष्टी कधी कधी दुर्लक्षित करा.
पार्टनरच्या भावना ओळखून त्याला महत्त्व द्या. त्या भावना सतत दुर्लक्षित झाल्यास व्यक्ती भावनिकदृष्ट्या दूर जातो.
पार्टनरची इतरांशी तुलना करणे हा नात्यातील विषारी घटक आहे. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, त्याला तसेच स्वीकारा. नात्यात चुका होतातच. त्यासाठी माफी मागणं आणि समोरच्याला माफ करणं फार आवश्यक आहे. यातून नात्याला नवी ऊर्जा मिळते.