पावसाळ्यात जंतूचा प्रादुर्भाव मोठ्य़ा प्रमाणात होत असतो. यामुळे पावसाळ्यात अनेक आजरांना आमंत्रण मिळतं.
अनेकांना वांग्याची भाजी, भरलं वांग, वांग्याचे काप खूप आवडतात मात्र पावसाळ्यात वांग खाणं शरीरासाठी घातकं ठरु शकतं.
वांग्यात अक्ललॉइड नावाचा घटक असतो . पावसाळ्यात याचं प्रमाण जास्त वाढतं. त्यामुळे शरीरावर याचा गंभीर परिणाम होतो.
अल्कलॉइडमुळे अनेकांना त्वचाविकाराचा त्रास जाणवतो. अल्कलॉइड त्वचेला खाज सुटणं, पुरळ येणं या समस्या भेडसावतात.
पावसाळ्यात वांग्याला कीड मोठ्या प्रमाणात लागते, त्यामुळे आरोग्यतज्ञ असं सांगतात की, पावसाळ्यात वांग्याची भाजी खाऊ नये.