अनन्या पांडे ही बॉलिवूड मधील एक सुप्रसिद्ध अशी युवा अभिनेत्री असून कमी कालावधीतच तिने बॉलिवूड मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.
अनन्या ही सोशल मीडियावर नेहमी ॲक्टिव्ह असून ती तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत असते. तसेच नवीन प्रोजेक्ट, नवीन फोटो शूट, रील्स तसेच कुटुंबा सोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर करताना पाहायला मिळते.
अभिनेत्री अनन्या पांडे हिने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचा पांढऱ्या साडीतील काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. खरंतर अनन्याने हा लुक एका दिवाळी पार्टीसाठी केला होता. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.
अनन्या पांडे ही अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी असून तिने नुकताच आपला २४ वा वाढदिवस साजरा केला आहे. तिने पोस्ट केलेल्या साडीतील फोटोवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडला आहे.
२०२२ मध्ये अनन्याने गेहराईया आणि लायगर यांसारखे चित्रपट दिले. लायगर या चित्रपटातून अनन्या साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत दिसली होती. या चित्रपटातून अनन्याने साऊथमध्येदेखील पदार्पण केले.