साडीवरील लुक पूर्ण करण्यासाठी हातामध्ये विविध डिझाईनच्या रंगीत बांगड्या घातल्या जातात. रंगीत बांगड्यांचीशोभा वाढवी म्हणून त्यासोबत पारंपरिक पाटल्या किंवा तोडे परिधान केले जाते. लग्नातील नऊवारी किंवा सहावारी साडीवरील लुक आणखीनच उठावदार आणि स्टायलिश दिसावा, यासाठी वेगवेगळ्या डिझाईनच्या बांगड्या घातल्या जातात. पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत सर्वच स्त्रिया लग्नसोहळ्यातील लुक इतरांपेक्षा हटके आणि उठवडर दिसावा म्हणून वेगवेगळ्या डिझाईनच्या बांगड्या परिधान करत असे. चला तर पाहुयात राजेशाही बांगड्यांच्या काही आकर्षक आणि हटके डिझाईन. (फोटो सौजन्य – pinterest)
हातामध्ये शोभून दिसतील पाटल्या-तोड्यांच्या आकर्षक बांगड्या, लेटेस्ट डिझाइन्समुळे दिसेल रॉयल लुक

हल्ली प्रत्येकालाच लग्नसोहळ्यांमध्ये रॉयल दिसायचे असते. हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्यांमध्ये अंबारी कडा उठावदार दिसतो. मोठा पण वजनाने हलका असलेल्या कड्यावर सुबक नक्षीकाम केले जाते.

पैठणी साडी किंवा कांजीवरम सिल्क साडी नेसल्यानंतर त्यावर तुम्ही या डिझाईनचा सोरोस्की वर्क केलेला कडा घालू शकता. कड्यावर करण्यात आलेले बारीक नक्षीकाम उठावदार दिसते.

काहींना बांगड्या घालायला खूप जास्त आवडतात. अशावेळी तुम्ही साऊथ इंडियन पॅर्टनमधील कडे आणि मोठे गोठ नक्कीच ट्राय करू शकता नवरीचा लुक आणखीनच खुलून दिसावा म्हणून हिरव्या बांगड्यांमध्ये या डिझाईनचे कडे घालावेत.

नऊवारी साडी नेसल्यानंतर त्यावर प्रामुख्याने मोती दागिने घातले जातात. मोत्याचे दागिने साडीवरील लुक आणखीनच खुलून दिसावा, यासाठी परिधान केले जातात.

विविध रंगीत बांगड्या परिधान करायची आवड असलेल्या महिलांसाठी हा पॅर्टन उत्तम पर्याय आहे. यामध्ये तुम्ही कोणत्याही रंगाचे कस्टमाईजेशन करून घेऊ शकता.






