‘माझा होशील ना’ या मालिकेतून सई म्हणजेच अभिनेत्री गौतमी देशपांडे घराघरात पोहोचली आहे. या मालिकेमुळे तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. सध्या गौतमी कोणत्याही मालिकेत दिसत नसली, तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
गौतमी सतत आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्याबाबत लहान-लहान अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असते.नुकतंच अभिनेत्री व्हेकेशन एन्जॉय करताना दिसून आली. दरम्यान अभिनेत्रीने आपले फोटो शेअर करत ते ठिकाण कोणतं आहे ओळखण्याचं चॅलेंज चाहत्यांना दिलं होतं.
मजेशीर म्हणजे अभिनेत्रीने फक्त चुकीची उत्तरे देण्याचा आग्रह केला होता. अभिनेत्रीची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.सध्या गौतमीच्या या फोटोंवर लाईक्स आणि मजेशीर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. फक्त चाहतेच नव्हे तर सेलिब्रेटीसुद्धा कमेंट्स करत मजामस्ती करत आहेत.गौतमीला चाहते पुन्हा पडद्यावर पाहू इच्छित आहेत. गौतमी विराजससोबत लवकरच एका नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.