फोटो सौजन्य - pinterest
Google Maps आणि Ola Maps दोन्ही डिजिटल मॅपिंग आणि नेव्हिगेशन सेवा आहेत. Ola Maps मध्ये भारताविषयी अधिक स्थानिक माहिती दिली आहे. भारतीय वैशिष्ट्ये लक्षात घेऊन हे मॅप्स तयार करण्यात आलं आहे. Google Maps मध्येही अनेक फिचर्स दिलेली आहेत पण त्यात काही स्थानिक गोष्टींचा अभाव आहे.
Ola Maps प्रामुख्याने भारतावर लक्ष केंद्रित करतात. तर Google Maps संपूर्ण जग व्यापतो. याशिवाय Google Maps भारतातील प्रमुख ठिकाणे दाखवतो. Ola Maps हा भारत-केंद्रित नकाशा आहे, त्यामुळेच त्यामध्ये अगदी लहान ठिकाणेही लोकांना दाखवण्यात आली आहेत.
Ola Maps खास भारतीय उद्योजक, विद्यार्थी आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर यांच्या गरजांसाठी तयार करण्यात आला आहे. Ola Mapsचे युजर्स खूपच कमी असतील कारण ते फक्त भारतापुरते मर्यादित आहे. Google Maps ने संपूर्ण जग व्यापले आहे, म्हणूनच त्याचे युजर्स Ola Maps पेक्षा कितीतरी पटीने अधिक असतील.
Google Map जागतिक स्तरावर काम करतो. त्यामुळे Google Map अधिक अचूक आणि नेमका मानला जातो. भारताच्या दृष्टिकोनातून, Ola Map देशासाठी अधिक प्रभावी ठरू शकतो कारण देशातील सर्व ठिकाणे त्यात समाविष्ट केली गेली आहेत.
Ola Map ओला इलेक्ट्रिक या भारतीय राइड-हेलिंग कंपनीने तयार केले आहेत. Google Map जगातील सर्वात मोठ्या कंपनींपैकी एक Google ने तयार केला आहे. याशिवाय Google Map राइड-हेलिंग इंटिग्रेशनला प्रोत्साहन देतो.
Ola Map भारतातील अधिक स्थानिक डेटा स्रोत वापरू शकतात. तर Google Map जगभरातील डेटा स्रोतांवर अवलंबून आहे, Ola Map भारतासाठी अगदी अचूक आणि प्रभावी ठरू शकतो. पण Google Map जगभरातील डेटासह अनेक ठिकाणी लोकांना अचूकता प्रदान करतो.