बजरंगी भाईजानच्या मासूम मुन्नीचा हटके अंदाज. (फोटो सौजन्य - Social Media)
बजरंगी भाईजान चित्रपटातील मुन्नी ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री हर्षाली मल्होत्राने तिच्या @harshaalimalhotra_03 या इंस्टाग्राम हँडलवर नवा फोटोशूट शेअर केला आहे.
या छायाचित्रांमधील तिचे हटके पोजेस या छायाचित्रांना जरा हटके बनवत आहेत. तसेच तिने या Photoshoot च्या माध्यमातून आपल्या Photoholics चाहत्यांना 'खुर्चीचा वापर करून उत्कृष्ट फोटोज कसे काढता येतील?' याचे उत्तम उदाहरण दिले आहे.
या छायाचित्रांमधील दुसरी आकर्षणाची बाब म्हणजे तिचा हटके लुक! तिच्या या आऊटफिटने या छायाचित्रांना अधिक आकर्षक बनवले आहे.
हर्षालीने तिच्या पोस्टखाली 'Poof! Another day, another reason to stare.' असे कॅप्शन नमूद केले आहे. तसेच या Photoshoot बद्दल माहिती पुरवली आहे.
पोस्टखाली कॉमेंट्समध्ये चाहत्यांनी तर तिचे भरभरून कौतुक केले आहे. अनेकांनी तर 'मुन्नी, तू किती मोठी झालीस गं!' असे कॉमेंट्स केले आहेत.