अभिनेत्री श्रियाचा हटके अंदाज पाहिलात का? ( फोटो सौजन्य - Social Media )
अभिनेत्री श्रिया पिळगावकरने तिच्या @shriya.pilgaonkar या इंस्टाग्राम हॅण्डलवर काही छायाचित्र शेअर केले आहेत. सोशल मीडियावर तिच्या गोड स्माईलने धुमाकूळ केली आहे.
या छायाचित्रांचे मुख्य आकर्षण स्वतः श्रिया आणि तिचे निखळ सौंदर्य तर आहेच, त्याचबरोबर शूट लोकेशनही आहे. सुंदर अशा महालासमोर फोटो शूट करण्यात आले आहे.
त्या वाड्याची जर कुणी राणी असती तर नक्कीच ती 'श्रिया पिळगावकर'सारखी असती, असा नमुना या फोटोंच्या माध्यमातून पाह्यला मिळत आहे.
अभिनेत्रीने या पोस्टखाली कॅप्शनमध्ये सुंदर असे वाक्य लिहले आहे. तिने 'प्रेमाची बाग' या शब्दांनी या सुंदर छायाचित्रांना संबोधले आहे.
कॅप्शनमध्ये या छायाचित्रांबद्दल माहिती देण्यात आली असून कॉमेंट्समध्ये नेटकऱ्यांनी आणि चाहत्यांनी कौतुक आणि प्रतिसादाचा वर्षाव केला आहे.