'भूत कोला' प्रथा कशी असते (फोटो सौजन्य - Social Media)
'भूत कोला' हा प्रकार स्थानिक दैव तसेच रक्षण कर्त्या पवित्र आत्म्याची पूजा घडवून आणणारा प्रकार आहे. दक्षिण भारतातील तुळू भाषिकांकडून हा प्रकार साजरा केला जातो. एकंदरीत, गावच्या स्थानिकांकडून राखणदाराला पुजले जाते.
या प्रकारात एक नृत्य करणारा वारस घराणं, दरवर्षी दैवी वेष धारण करतो आणि कार्यक्रमादरम्यान त्याच्या अंगात दैव येतात. दरम्यान, दैव गावातील लोकांचे वाद मिटवता, त्यांना ऐकून घेतात.
हा विधी धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक जीवनाशी जोडलेला असून सर्व जातींच्या लोकांना ठराविक भूमिका दिल्या जातात.
हा विधी तुळू भाषा वापरून सादर केला जातो, ज्यात पड्डणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राचीन मौखिक कथा सांगितल्या जातात.
कोकणातही अशा काही प्रथा पाहिल्या जातात.