शिळ्या चपात्यांपासून बनवा मऊ आणि गोड गुलाबजाम
आता तुम्ही शिळ्या चपात्यांपासून अगदी सहज आणि झटपट गुलाबजाम बनवू शकता
यासाठी सर्वप्रथम शिळ्या चपात्यांचे तुकडे मिक्सरमध्ये टाकून यांचा चुरा करून घ्या
यांनतर हा चुरा एका भांड्यात काढून यात एक काप गरम दूध आणि अर्धा चमचा वेलची पूड घालून मिक्स करा
नंतर यात 2 चमचे तूप, अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि थोडे मीठ टाकून मिक्स करा
त्यांनतर मिश्रणात 1.5 कप मिल्क पावडर टाका आणि हाताने पीठ मळून घ्या
आता या पिठाचे गोल गुलाबजाम वळून घ्या आणि नंतर तेलात मध्यम आचेवर हे तळून घ्या
दुसरीकडे साखरेचा पाक तयार करून त्यात हे तयार गुलाबजाम टाका आणि काहीवेळ मुरायला ठेवा
अशाप्रकारे तुमचे शिळ्या चपातीपासून गुलाबजाम टेस्टी तयार होतील